फोटो सौजन्य- pinterest
बऱ्याचदा घरामध्ये काही ना काही कारणांवरुन वाद होणे, आर्थिक समस्या उद्भवणे यांसारख्या घटना घडत असतात. वादामुळे राग येणे, संताप अनावर होणे अशा घटना घडत असतात. त्यामुळे नात्यामध्ये अंतर येऊन घरातील वातावरण बिघडते म्हणजेच घरातील असलेली शांतता किंवा सकारात्मकता दूर होते. पण असे घडत असताना आपण मोगरा वनस्पती घरामध्ये लावणे योग्य मानले जाते. पण एवढेच पुरेसे नसते कारण ते लावताना आपल्या योग्य दिशेची देखील काळजी घ्यावी लागते. घरामध्ये मोगरा वनस्पती कधी आणि कोणत्या दिशेला लावावी, जाणून घ्या
मोगरा ही अशी वनस्पती आहे त्याला सुंदर असा सुंगध असतो त्यामुळे ती घरात ठेवल्याने मनाला शांती देखील मिळते. तसेच तिच्या सुंगधामुळे आजूबाजूच्या वातावरणामधील असलेली नकारात्मकता दूर देखील होते. त्यामुळे घरातील वातावरणात कायम सकारात्मकता राहते. वास्तुशास्त्रामध्ये मोगरा वनस्पतीला वास्तूशास्त्रामध्ये विशेष स्थान आहे. या वनस्पतीचा वापर केवळ सजावटीच नाही तर ऊर्जा संतुलित करण्याचे काम देखील करते.
मोगरा वनस्पतीचा संबंध शुक्र ग्रह आणि चंद्राशी संबंधित असल्याचे मानले जाते. शुक्र ग्रहाला प्रेम, आकर्षण आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, तर चंद्र मन आणि शांतीशी संबंधित आहे. म्हणूनच या वनस्पतीच्या उपस्थितीमुळे घरात प्रेम वाढते आणि मनाला आराम मिळतो.
वास्तुशास्त्रानुसार, जर मोगरा वनस्पती योग्य दिशेने लावलास त्याचा आपल्या घरावर प्रभावी परिणाम होतो. मोगरा वनस्पती घरामध्ये लावण्यासाठी वायव्य दिशा सर्वांत चांगली मानली जाते. या दिशेला वनस्पती लावल्याने घरामध्ये सुसंवाद वाढतो आणि नात्यांमध्ये गोडवा टिकून राहतो, असे वास्तूशास्त्रानुसार म्हटले जाते.
मात्र तुम्हाला घरामधील वायव्य दिशा ओळखता येत नसल्यास तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता किंवा बाल्कनीमध्ये देखील ठेवू शकतात. फक्त ही वनस्पती ठेवताना घरामध्ये चांगला प्रकाशमान येत असेल अशा जागेवर ठेवा, ही काळजी आपल्याला घ्यायला हवी. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तणाव असल्यास किंवा वारंवार छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाद होत असल्यास घरामध्ये मोगरा वनस्पती लावणे फायदेशीर ठरते. यामुळे पती पत्नीमधील गैरसमज दूर होऊन नात्यामधील प्रेम, गोडवा वाढण्यास मदत होते. याशिवाय शुक्रवारी देवी लक्ष्मीला मोगरा वनस्पती अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे साधकाच्या जीवनात धनप्राप्ती आणि सुख समृद्धी येते, अशी मान्यता आहे.
मोगरा वनस्पतीची काळजी घेणे खूप सोपे आहे. कारण या वनस्पतीला जास्त पाणी लागत नाही. फक्त थोडासा सूर्यप्रकाश लागतो. ज्यावेळी ती वनस्पती फुलते त्यावेळी तिचा सुंगध संपूर्ण घरामध्ये पसरतो. त्यामुळे घरातील वातावरणच नाही तर मनाला देखील शांतता मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)