फोटो सौजन्य- pinterest
आजचा शनिवारचा दिवस काही मूलांकासाठी विशेष राहील. मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य देव आहे. सूर्य देवाचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर राहील. तर मूलांक 8 असणाऱ्यांना आर्थिक समस्या दूर होतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात आणि लोक तुमचा सल्ला घेऊ शकतात. तुमचे कोणते महत्त्वाचे काम अपूर्ण राहिले असेल तर ते पूर्ण होईल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुमची एखाद्या जुन्या लोकांची भेट होऊ शकते. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांना मदत करावी लागेल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. अध्यापन, मार्गदर्शन किंवा सादरीकरणाशी संबंधित कामात शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
मूलांक 4 असणाना कामाच्या ठिकाणी जास्त ताण असू शकतो. यामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांशी संबंधित कामात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नेटवर्किंगच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकते. कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावे लागेल. तुमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला भेटल्याने तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सर्जनशील ऊर्जा अधिक प्रभावी ठरू शकते.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तांत्रिक, संशोधन किंवा गूढ विषयांमध्ये गुंतलेल्या लोकांना आज फायदा होऊ शकतो. जुन्या अनुभवातून तम्हाला आज नवीन काहीतरी शिकायला मिळू शकते.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमची प्रशंसा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. अधिकाऱ्यांशी बोलताना तुम्हाला संयम ठेवावा लागेल. व्यवसायात पैसे गुंतवले असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. कामामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. हे लोक सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च करणे टाळा. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)