Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: फ्रिजवर या वस्तू ठेवल्यास वाढू शकतात अडचणी, काय सांगते वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, फ्रिजवर चुकीच्या वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा, तणाव आणि आर्थिक समस्या वाढू शकतात. फ्रिजवर कोणत्या गोष्टी ठेवल्यास अडचणी वाढू शकतात ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 11, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • फ्रिजवर या वस्तू ठेवल्यास वाढू शकतात अडचणी
  • फ्रीजवर कोणत्या वस्तू ठेवू नये
  • वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात फ्रीजचे काय आहे महत्त्व
 

घरातील छोट्या सवयींचा कधीकधी मोठा परिणाम होऊ शकतो आणि आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः स्वयंपाकघरातील आणि घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत, लोक विचार न करता फ्रिजवर वस्तू ठेवतात. मात्र वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात या सवयींबद्दल सांगण्यात आलेले आहे. असे मानले जाते की, फ्रीज थंडावा, स्थिरता आणि चंद्राच्या ऊर्जेशी संबंधित आहे, तर त्यावर ठेवलेल्या वस्तू ग्रहांच्या ऊर्जेचा प्रवाह विस्कळीत करू शकतात.

शनि, राहू आणि चंद्र यांच्या असंतुलित स्थितीमुळे घरातील तणाव, आर्थिक चढउतार आणि आरोग्याच्या समस्याही वाढू शकतात. म्हणूनच, फ्रीजवर वस्तू ठेवताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात, कारण थोड्याशा निष्काळजीपणामुळेही मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Vastu Tips: घरात चिंचेचे रोप लावणे का मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातील फ्रीजचे महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार, फ्रीज ही केवळ एक इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही; तर त्याचा घराच्या ऊर्जेवरही परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, त्याचा संबंध चंद्राशी जोडला जातो, जो मन, भावना आणि मानसिक स्थिरतेमधील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. जेव्हा फ्रिजच्या वर पसारा साचतो, तेव्हा चंद्राची ऊर्जा असंतुलित होते, ज्याचा थेट परिणाम कौटुंबिक वातावरणावर होतो. लोक अनेकदा विचार न करता तिथे वस्तू ठेवतात, ज्यामुळे राहू आणि शनिसारख्या ग्रहांचे नकारात्मक प्रभाव देखील सक्रिय होऊ शकतात.

औषधे ठेवल्याने बिघडू शकते आरोग्य

फ्रिजच्या वरच्या बाजूला औषधे ठेवणे ही एक सामान्य चूक आहे, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, याचा चंद्र आणि बुध ग्रहांच्या ऊर्जेवर परिणाम होतो. यामुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि आजारपण लांबणीवर पडू शकते.

या गोष्टींमुळे ग्रहांचे वाढते असंतुलन

ज्योतिषशास्त्रानुसार, संपत्तीचा संबंध शुक्र आणि गुरू ग्रहांशी जोडला जातो. फ्रीजवर पैसे किंवा कागदपत्रे ठेवल्याने या ग्रहांची ऊर्जा अस्थिर होऊ शकते, ज्यामुळे अनपेक्षित खर्च आणि वाढता आर्थिक ताण येऊ शकतो.

Astro Tips: घराच्या उंबरठ्यावर उभे असताना करू नका या चुका, जीवनात येऊ शकतात समस्या

धार्मिक चित्रे किंवा मूर्ती

फ्रिजसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर देवाचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने ऊर्जेचा संघर्ष निर्माण होतो, असे मानले जाते. यामुळे मानसिक अशांती येऊ शकते आणि घरातील सकारात्मक ऊर्जेत घट होऊ शकते.

काटेरी वनस्पती

निवडुंग किंवा काटेरी वनस्पती राहूची नकारात्मक ऊर्जा सक्रिय करू शकतात, ज्यामुळे घरात संघर्ष, तणाव आणि कलह निर्माण होऊ शकतो.

तुटलेल्या वस्तू आणि पसारा

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, तुटलेली भांडी, रिकाम्या बाटल्या किंवा जुने डबे शनि आणि राहूची नकारात्मक ऊर्जा वाढवतात. अशा वस्तू फ्रिजवर ठेवल्याने जीवनात अडथळे, कामात विलंब आणि मानसिक ताण येऊ शकतो. या ऊर्जेचा परिणाम घराच्या प्रगतीवरही होतो.

स्वच्छतेमुळे बदलू शकते ऊर्जा

फ्रिज स्वच्छ आणि पसारा-मुक्त ठेवल्याने चंद्राची सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे घरात शांती, स्थिरता आणि आर्थिक संतुलन येते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार फ्रीजच्या वर वस्तू ठेवल्यामुळे त्याचा परिणाम घरातील ऊर्जेवर होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्रिजच्या वर वस्तू ठेवणे वास्तुनुसार योग्य मानले जाते का?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार फ्रिजच्या वर खूप जड किंवा अनावश्यक वस्तू ठेवणे टाळावे, असे मानले जाते.

  • Que: वास्तुशास्त्र नुसार फ्रिजवर कोणत्या वस्तू ठेवू नयेत?

    Ans: औषधे, देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, जुने कागद, रिकामे डबे, तुटलेल्या वस्तू

  • Que: घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्यामागे वास्तुदोष कारणीभूत असू शकतो का?

    Ans: वास्तुश्रद्धेनुसार चुकीची मांडणी, अव्यवस्था आणि तुटलेल्या वस्तूंमुळे नकारात्मकता वाढू शकते.

Web Title: Vastu tips keeping these items in the fridge can increase problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: अनावश्यक खर्च कमी करून धनसंपत्ती वाढवण्यासाठी करा वास्तूचे हे उपाय
1

Vastu Tips: अनावश्यक खर्च कमी करून धनसंपत्ती वाढवण्यासाठी करा वास्तूचे हे उपाय

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी
2

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा
3

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.