फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 13 जुलै रोजी चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. गुरु आर्द्रा नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. चंद्र गुरुपासून सहाव्या घरात संक्रमण करताना वसुमन योगाची जोड निर्माण करेल. धनिष्ठा नक्षत्राच्या संयोगाने प्रीती योगाचा संयोग तयार होत आहे. सूर्य आणि गुरु यांच्या संयोगाने गुरु आदित्य योग देखील तयार होत आहे. मात्र आज रविवार असल्याने आज सूर्यदेवाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. वसुमान योग आणि सूर्यदेवाच्या कृपेमुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांसाठी अपेक्षित लाभ मिळू शकतो. या लोकांच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहील. 13 जुलैचा आजचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असेल, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळू शकते. सरकारी कामासाठी असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. मोठ्या भावडांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमच्या नातेसंबंधामध्ये गोडवा राहील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. या लोकांना कामाच्या ठिकाणी नशिबाची साथ मिळेल. ज्या लोकांची दीर्घकाळापासून कामे प्रलंबित राहिलेली आहेत ती पूर्ण होतील. व्यवसायानिमित्ताने तुम्ही लांबचा प्रवास करु शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा रविवारचा दिवस अपेक्षेपेक्षा अधिक चांगला राहील. तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. जर तुम्ही व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर एखादी व्यक्ती नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसायामध्ये तुम्ही नवीन बदल करु शकता ज्याचा तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांची इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा रविवारचा दिवस विशेष राहील. व्यवसायात पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील. तसेच या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही परदेशात जाऊ शकतात. कोणतेही व्यवहार अडकले असतील ते आज पूर्ण होतील. आयात-निर्यात, रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, लॅब इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. तसेच या लोकांना धार्मिक कार्यातील रस वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)