फोटो सौजन्य- pinterest
आज 13 जुलैचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास आहे. कारण आज चंद्र कर्क राशीत प्रवेश करत असल्याने काही मूलांकांच्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात आपले लक्ष केंद्रित करावे लागेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्याना लाभ होईल. हे लोक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील.
मूलांक 2 असणाऱ्यांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना कोणतेही काम करताना समजदारीने करावे. कुटुंबामध्ये असलेले मतभेद दूर होतील. नातेसंबंध चांगले राहील.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक गोष्टीसाठी आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये या लोकांना अनेक बदलांना सामोरे जावे लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल असेल. तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन योजना सुरू करू शकतात त्याचा तुम्हाला फायदा होईल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील.
मूलांक 7 असलेल्या लोकांनी आपल्या कामाबाबत सर्जनशीलता बाळगावी. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन करण्यासाठी संधी उपलब्ध होतील. तांत्रिक किंवा संशोधन कार्यात रस वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे टाळा.
मूलांक 8 असलेल्या लोकांवर कामाचा ताण राहू शकतो. तुम्ही कोणतीही काम करताना समजूतीने आणि शहाणपणाने पूर्ण करावीत. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी
मूलांक 9 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतील. या लोकांची निर्णय घेण्याची क्षमता सुधारु शकते. तसेच हे लोक सामाजिक कार्यक्रमात रस घेतील. यामुळे तुमचा आदर वाढलेला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)