फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 13 जुलै रोजी संध्याकाळी चंद्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यावेळी तो राहू ग्रहाशी युती करेल. या ग्रहांच्या युतीमुळे तयार होणाऱ्या योगाला चंद्रग्रहणासारखे परिणाम होऊ शकतात. ज्यामुळे काही राशीच्या लोकांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकते.
चंद्राला मन, भावना आणि निर्णय घेण्याची क्षमता असणारे दर्शविले जाते तर राहूला गोंधळ, अस्थिरता आणि अचानक बदल दर्शविले जाते. या दोघांच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांच्या मनामध्ये मानसिक अस्वस्थता, गोंधळ, चुकीचे निर्णय आणि अवांछित परिस्थितींना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे काही राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या राशी, जाणून घ्या
कुंभ राशीमध्ये असलेली चंद्राची स्थिती वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप आव्हानात्मक असू शकते. यावेळी काही लोकांच्या कुटुंबातील वातावरण बिघडू शकते. म्हणजे आई किंवा घरातील वृद्ध महिलेशी संबंधित चिंता निर्माण होऊ शकते. काहींना अस्वस्थ वाटू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होऊ शकते. तुम्हाला मानसिक थकवा देखील जाणवू शकतो, ज्यामुळे तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही.
या योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची खूप आवश्यकता आहे. विशेषतः संवाद आणि प्रवासाच्या बाबतीत. कोणीतरी तुमच्या बोलण्याचा गैरसमज करू शकतात, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. कामामध्ये लक्ष विचलित होऊ शकते. कोणतेही निर्णय घाईघाईने घेतले आहेत असे वाटू शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ थोडा अस्थिर राहील त्यामुळे गुंतवणूक करणे किंवा मोठे खर्च करणे टाळा.
या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर आणि व्यावसायिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला नेहमीपेक्षा कमी आत्मविश्वास वाटू शकतो आणि तुमचे नेतृत्व कौशल्य कमकुवत वाटू शकते. तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही उदास राहू शकता. सामाजिक सन्मान कमी होऊ शकतो किंवा तुम्हाला काही टीकेला सामोरे जावे लागू शकते.
या योगाचा परिणाम तूळ राशीच्या लोकांवर होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या नात्यामध्ये कटुता किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. जर काही कायदेशीर प्रकरण चालू असेल तर त्यात विलंब किंवा गोंधळ होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या तुम्हाला असंतुलित आणि संवेदनशील वाटू शकते. मानसिक थकवा येऊ शकतो.
चंद्र आणि राहूची युती कुंभ राशीत होत असल्यामुळे या राशीच्या लोकांवर जास्तीत जास्त परिणाम होताना दिसून येऊ शकतो. तुमचे मन पुन्हा पुन्हा गोंधळलेले राहील. निर्णय घेण्यास संकोच वाटेल आणि आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. आर्थिक स्थितीही डळमळीत होण्याची शक्यता आहे. अचानक खर्च किंवा अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबतही सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)