फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी शनिवार, 28 जून रोजी आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधीवत पूजा केल्याने भक्तावर गणपती बाप्पाची कृपा राहते, असे म्हटले जाते. मान्यतेनुसार, गणपतीची पूजा केल्याने ज्ञान, विवेक, समृद्धी आणि आनंद मिळतो, अशी मान्यता आहे. जर तुम्हालाही गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवायचा असेल, मनातील सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतील तर विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला या गोष्टींचा नैवेद्य दाखवा. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडतात. शास्त्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे गणपती बाप्पाला 21 दुर्वाच्या जुडी अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने गणपती बाप्पाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते. दुर्वा अर्पण करतेवेळी “ॐ गं गणपतये नमः” या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते.
गणपती बाप्पाला दुर्वाप्रमाणेच मोदक आणि लाडू देखील खूप आवडतात. त्यामुळे या दिवशी त्यांना मोदक किंवा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. असे मानले जाते की, या गोष्टींचा नैवेद्य दाखवल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते.
या सर्व गोष्टी व्यक्तिरिक्त गणपती बाप्पाला लाल रंगांचे फूल खूप आवडते. त्यामुळे लाल जास्वंद फुले किंवा कोणतेही लाल फूल अर्पण करा किंवा पूजेमध्ये या फुलांचा समावेश करा. यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात.
शमी ही वनस्पती आहे. ही वनस्पती भगवान शिव आणि गणपती या दोघांनाही प्रिय आहे. असे म्हटले जाते की, शमीची पाने अर्पण केल्याने घरामध्ये धन आणि समृद्धी वाढते. त्यासोबतच शनि दोषांच्या असलेल्या समस्या दूर होतात.
गणपती बाप्पाला केळी देखील खूप आवडतात. ते अर्पण करताना कधीही एक केळ ठेवू नये तर दोन किंवा अनेक केळी ठेवणे शुभ मानले जाते.
कोणत्याही देवताची पूजा करताना पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. गणपती बाप्पाला नारळ अर्पण करणे फायदेशीर मानले जाते.
विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने भक्ताची सुख समृद्धी शांती अशा सर्व अडचणींतून सुटका होते अशी मान्यता आहे. या दिवशी गणपती बाप्पाची विधीवत पूजा केल्याने ते प्रसन्न होऊन भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)