फोटो सौजन्य- pinterest
ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेचा उत्सव जगभरातील लोक मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने पाहतात. यंदा या यात्रेची सुरुवात आज म्हणजेच शुक्रवार, 27 जूनपासून झालेली आहे. या यात्रेची समाप्ती मंगळवार, 8 जुलै रोजी होणार आहे. ही यात्रा 12 दिवस चालते. या 12 दिवसांतील प्रत्येक दिवसाला असे विशेष महत्त्व आहे.
यंदा आषाढ शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार, 27 जून आहे. या दिवसापासून रथयात्रेची सुरुवात होत आहे. पंचांगानुसार, 27 जून रोजी सकाळी 5.25 ते 7.22 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग तयार झालेला आहे. या योगानंतर पुष्य नक्षत्र आहे. आजचा अभिजित मुहूर्त रात्री 11.56 ते 12.52 पर्यंत आहे. याच काळात प्रभूची यात्रा सुरु होणार आहेत.
रथयात्रेच्या पहिल्या दिवशी पुरीचा राजा स्वतः ‘छेरा पन्हारा’ यावेळी विधी करतो. ज्यामध्ये तो रथाचा खालचा भाग सोनेरी झाडूने स्वच्छ करतो. याला नम्रता आणि सेवेचे प्रतीक मानले जाते. ‘हेरा पंचमी’च्या दिवशी देवी लक्ष्मी गुंडीचा मंदिरात जाते आणि प्रभूने तिला का सोडले याबद्दल नाराजी व्यक्त करते. ही घटना संपूर्ण प्रवासाला आणखी मनोरंजक बनवते.
जगन्नाथ रथयात्रेमध्ये ओढल्या जाणाऱ्या तीन दोऱ्यांनाही स्वतःची अशी नावे आहेत. त्यातील भगवान जगन्नाथाच्या 16 चाकी रथाला नंदी घोष असे म्हटले जाते. नंदी घोष या रथाच्या दोरीचे नाव शंखचूड नाडी असे आहे.
दुसरे बलभद्र याच्या 14 चाकांच्या रथाला तलध्वज असे म्हणतात. तलध्वज या रथाच्या दोरीला बासुकी या नावाने ओळखले जाते. तसेच तिसरी दोरी म्हणजेच सुभद्रेचा 12 चाकी रथ याला दर्पदलन असे म्हटले जाते. दर्पदलन या रथाच्या दोरीला स्वर्णचुडा नाडी या नावाने देखील ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या दोऱ्या केवळ रथ ओढण्याचे साधनच नाही तर त्याला स्पर्श करणे म्हणजे भाग्य आहे, असे मानले जाते.
या रथेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. तो कोणताही व्यक्ती असो, त्यावेळी धर्म, जात किंवा देश पाहिले जात नाही. यामध्ये एक अट असते ती म्हणजे तुम्ही भक्तीने, खऱ्या मनाने हा रथ ओढावा. मान्यतेनुसार, रथाची दोरी ओढणारा व्यक्ती जीवन आणि मृत्युच्या चक्रातून मुक्त होतो आणि मोक्षाकडे वाटचाल करतो असे मानले जाते.
दरम्यान, एकटा व्यक्ती हा रथ जास्तवेळ ओढू शकत नाही. यावेळी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला संधी मिळावी म्हणून हे केले आहे. जरी तुम्ही रथ ओढू शकला नाहीत तरी काळजी करण्याची गरज नसते. कारण असे म्हटले जाते की, खऱ्या मनाने सहभागी झाल्याने यज्ञांइतकेच पुण्य मिळते.
स्कंदपुराणात उल्लेख केल्यानुसार, एके दिवशी भगवान जगन्नाथांची बहीण सुभद्रा हिने शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मग जगन्नाथ आणि बलभद्र यांनी तिला रथावर बसवून शहर फिरवले. या काळात ते त्यांच्या मामी गुंडिचा यांच्या घरीही गेले आणि सात दिवस तिथे राहिले. त्या वेळेपासून ही परंपरा सुरु झाली असल्याचे म्हटले जाते. ही परंपरा आजही सुरु आहे. आजसुद्धा या यात्रेची सुरुवात मंदिरापासून होऊन गुंडीच्या मंदिरापर्यंत रथांमधून होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)