फोटो सौजन्य- pinterest
भारतीय संस्कृतीमध्ये कडुलिंब पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते. कडुलिंब ही एक औषधी वनस्पती मानली जाते. या वनस्पतीमध्ये अनेक गुणधर्म असलेले आढळतात. या कडुलिंबाला आयुर्वेदातच नव्हे तर ज्योतिषशास्त्रात देखी महत्त्वाचे स्थान आहे. कडुलिंबाच्या पानांपासून तयार केलेले पाणी सेवन केल्याने किंवा कडुलिंबाच्या पानांने आंघोळ केल्याने आपले अनेक आजार दूर होतात, असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये कडुलिंबाचा उपयोग ग्रहांचा प्रभाव दूर करण्यासाठी आणि नकारात्क ऊर्जा नष्ट करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. कडुलिंबाने आंघोळ करण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रामध्ये असे मानले जाते की, कडुलिंबाचा संबंध शनि, राहू आणि केतू या ग्रहांशी संबंधित असल्याचे मानले जाते. म्हणून कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास ग्रहांचा असलेला प्रभाव दूर होण्यास मदत होते. खासकरुन ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनिची साडेसाती, केतू आणि राहू या टप्प्यातून जावे लागत असेल, अशा लोकांनी विशेषतः कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो.
मान्यतेनुसार, कडुलिंबाचा हा उपाय आठवड्यातून 2 वेळा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यासोबतच कडुलिंबाच्या वापराने काळ्या जादूचे परिणामही कमी होतात.
कडुलिंबाच्या वापराचा उल्लेख शास्त्रीय ग्रंथांमध्ये देखील केलेला आढळतो. गरुड पुराणामध्ये उल्लेख केल्यानुसार, घरामध्ये कडुलिंब लावावे किंवा त्याच्या पाण्याने आंघोळ करावी यामुळे शरीर आणि मन दोन्हीची शुद्धी होते, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे अर्थवेदामध्ये देखील कोणतेही आजार बरे करण्यासाठी कडुलिंबाचा वापर करण्यासाठी याला पवित्र वृक्ष असे म्हटले जाते.
आंघोळीआधी कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये चांगली उकळून घ्यावी. नंतर ती थंड झाल्यावर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याचा आंघोळीसाठी वापर करता येऊ शकतो. या पानांने आंघोळ केल्याने त्वचेच्या संबंधित असलेले आजार दूर होतात. तसेच त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते.
ज्योतिषशास्त्रामध्ये कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने पोट, रक्त, त्वचा, केस आणि शरीरातील अशुद्धता दूर होण्यास मदत होते. असे म्हटले जाते की, पोट आणि शरीरातील अशुद्ध गोष्टी दूर होतात. त्यामुळे आवड्यातून एकदा कडुलिंबाची पाने चावून सेवन केल्याने शारीरिक फायदे होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)