Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Chaturthi: अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व 

अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत 25 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने यश, ज्ञान, संपत्ती, आनंद आणि समृद्धी मिळते. यावेळी विनायक चतुर्थीच्या पूजेसाठी मुहूर्त काय आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 20, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

विनायक चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार  अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी आहे. अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की विनायक चतुर्थीला बाप्पाची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व त्रासातून सुटका होते. या व्रताच्या वेळी संततीशी संबंधित प्रत्येक समस्या सोडवली जाते. कुटुंबाच्या वाढीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते.

विनायक चतुर्थी मुहूर्त

पंचांगानुसार, आश्विन शुक्ल चतुर्थी तिथीची सुरुवात गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7.6 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9.33 वाजता संपेल. गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 11 ते दुपारी 1.25 पर्यंत असेल.

Palmistry: तळहातावरील रेषा असतात अत्यंत अशुभ, काय आहे या रेषेचा जीवनाशी संबंध

विनायक चतुर्थीच्या व्रताचे फायदे

विनायक चतुर्थीला वरदा विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते. कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी वरद हे देवाचे वरदान आहे. विनायक चतुर्थीचे व्रत करणाऱ्या भक्तांना भगवान गणेश बुद्धी आणि संयमाचे आशीर्वाद देतात. बुद्धी आणि संयम हे दोन नैतिक गुण आहेत ज्यांचे महत्त्व शतकानुशतके मानवजातीने ओळखले आहे. ज्या व्यक्तीकडे हे गुण असतात तो जीवनात खूप प्रगती करतो आणि इच्छित परिणाम साध्य करतो, असे देखील म्हटले जाते.

विनायक चतुर्थी पूजा पद्धत

सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करा. एका चौरंगावर पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र पसरवून त्यावर बाप्पाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर सिंदूर, तांदळाचे संपूर्ण धान्य, दुर्वा, लाल फुले, सुकामेवा आणि मोदक त्यांना अर्पण करा. नंतर ओम गं गणपतये नमः या मंत्रांचा जप करावा किंवा गणेश चालीसा, गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्राचा पाठ करा.

Astro Tips: सोन्याची अंगठी घालताना तुम्ही ही चूक करता का? जाणून घ्या सोने घालण्याचे नियम

बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करुन बाप्पाची पूजा करावी. त्यानंतर बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. त्यानंतर शुद्ध तूप आणि गूळ देखील अर्पण करा. नंतर वक्रतुंडय हम या मंत्रांचा जप करावा. असे करणे आर्थिक लाभासाठी फायदेशीर मानले जाते. यासोबतच गाईला तूप आणि गूळ खायला घाला आणि गरिबाला द्या. त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. हे उपाय सलग पाच दिवस करावे. असे केल्याने तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vinayak chaturthi ashwin month muhurt importance benifit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
2

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
3

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
4

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.