फोटो सौजन्य- pinterest
व्यक्तीच्या कुंडलीनुसार ग्रहांच्या स्थितीनुसार विश्लेषण केले जाते. याचप्रमाणे हस्तरेखाशास्त्रामध्ये देखील व्यक्तीचे तळहातावरील रेषा आणि चिन्हांवरुन भविष्य सांगता येते. हातावरील रेषा बघून वैवाहिक जीवन, करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती याबद्दल देखील समजते. मात्र एखादी रेषा अशुभ असल्यास व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा काही रेषा असतात ज्यामुळे व्यक्तीला संघर्षाचा सामना करावा लागतो. तळहातावरील कोणत्या रेषा अशुभ असतात, जाणून घ्या
हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातावरील वाकड्या रेषा आणि खुणा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील वैशिष्ट्ये उलगडतात. शिवाय, या रेषा पाहिल्यास जीवनाची स्थिती आणि दिशा सहजपणे ठरवता येते. तळहातावरील अशी काही चिन्हे असतात जी खूप अशुभ मानली जातात. ज्याच्या हातावर अशा खुणा असतात अशा लोकांच्या जीवनामध्ये खूप संकटं येतात. अशा व्यक्तीला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने ताण येतो.
हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातावर डाग दिसणे खूप अशुभ मानले जाते. असे मानले जाते की, जर एखाद्याच्या तळहातावर मेंदू रेषेजवळ लाल ठिपका असलेली रेषा ज्या लोकांच्या तळहातावर असते त्यांनी वाहनांपासून सावध राहावे. याचा अर्थ अशा लोकांनी गाडी चालवताना, रस्त्यावर चालताना सावधगिरी बाळगावी. जर आरोग्य रेषेवर डाग असल्यास या लोकांना शारीरिक आजार जाणवू शकतात.
ज्या व्यक्तीच्या तळहातावर निळे किंवा काळे डाग असतात ते अशुभ मानले जातात. या डागांचा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीवर काळ्या जादूचा सहज परिणाम होतो आणि तो सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या संबंधित समस्येचा सामना करत असतो. म्हणजेच या डागांवर नकारात्मक शक्तींचा लवकर परिणाम होतो ज्यामुळे जीवनामध्ये काही ना काही समस्या उद्भवतात.
जर एखाद्या व्यक्तीच्या मनगटावर जाळीचे चिन्ह असल्यास ते अशुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला जीवनामध्ये प्रगतीत अडथळा येतो. कोणत्याही प्रयत्नात निराशा आणि अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, ज्यामुळे मानसिक ताण येतो.
ज्यावेळी तळहातातील जीवनरेषा आणि आरोग्यरेषा एकत्र येते तेव्हा ती अशुभ मानली जाते. अशा व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले जाण्याची शक्यता असते. गंभीर आजार होण्याची देखील शक्यता आहे. या रेषेचा संबंध आरोग्याशी संबंधित असतो.
जर एखाद्या व्यक्तीच्या भाग्यरेषेवर क्रॉस चिन्ह असते अशा लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यावेळी त्यांना नशिबाची साथ मिळत नाही. आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)