Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayaka Chaturthi 2026: जून महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

प्रद्युम्न विनायक चतुर्थीचे व्रत ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी तिथीला पाळले जाते. या दिवशी पाच शुभ योग जुळून येत आहे. या व्रतादरम्यान चंद्राची पूजा केली जात नाही किंवा चंद्राकडे पाहिलेही जात नाही. जून महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 18, 2026 | 08:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • जून महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे
  • विनायक चतुर्थीचे महत्त्व
  • विनायक चतुर्थीला तयार होत आहे शुभ योग
 

प्रद्युम्न विनायक चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते. या दिवशी लोक उपवास करतात आणि विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा करतात. या विनायक चतुर्थीला पाच शुभ योग जुळून येत आहेत, ज्यामुळे ही चतुर्थी अधिक फलदायी ठरत आहे. या चतुर्थीच्या उपवासादरम्यान केवळ चंद्राची पूजाच नव्हे, तर त्याचे दर्शन घेणेही निषिद्ध आहे. जून महिन्यात विनायक चतुर्थी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया

कधी आहे विनायक चतुर्थी

पंचांगानुसार, ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी तिथीची सुरुवात १७ जून रोजी रात्री ९:३८ वाजता झाली आहे आणि या तिथीची समाप्ती १८ जून रोजी सायंकाळी ६:५८ वाजता होणार आहे. त्यामुळे, उदयतिथीनुसार, विनायक चतुर्थीचे व्रत गुरुवार, १८ जून रोजी पाळले जाणार आहे.

विनायक चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्त

या विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा दुपारी केली जाते. त्यामुळे, प्रद्युम्न विनायक चतुर्थी पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी १०:५८ ते दुपारी १:४६ पर्यंत आहे. तुम्हाला भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी २ तास ४८ मिनिटे मिळतील. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:०३ ते पहाटे ४:४३ पर्यंत आहे, तर शुभ मुहूर्त, अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५४ ते दुपारी १२:५० पर्यंत आहे.

Guru Pushya Yog 2026: गुरु-पुष्य नक्षत्राचा महाशक्तिशाली योग, कर्क आणि मकर राशींसह या राशींच्या धन समृद्धीत होणार वाढ

शुभ योगामध्ये विनायक चतुर्थी

१८ जून रोजी विनायक चतुर्थीला पाच शुभ योगायोग जुळून येत आहेत. विशेष बाब म्हणजे हे सर्व शुभ योगायोग एकाच वेळी घडत आहेत आणि एकाच वेळी संपत आहेत. विनायक चतुर्थीच्या दिवशीच गुरुवारी उपवासही आहे. यावेळी गुरु पुष्य योग सकाळी 05:23 ते 11:32 पर्यंत असेल. सर्वार्थ सिद्धि योग सकाळी 05:23 ते 11:32, रवि योग सकाळी 05:23 ते 11:32, अमृत सिद्धि योग सकाळी 05:23 ते 11:32, पुष्य नक्षत्र सकाळी 05:23 ते 11:32 पर्यंत असणार आहे.

विनायक चतुर्थीला चंद्र कधी पाहू नये?

विनायक चतुर्थीला चंद्रोदय सकाळी ८:४४ वाजता होईल आणि रात्री १०:२८ वाजता चंद्र मावळेल. त्यामुळे, विनायक चतुर्थीला १३ तास ​​४४ मिनिटे चंद्र पाहणे टाळावे. या दिवशी चंद्र पाहणे हे एक पाप मानले जाते.

विनायक चतुर्थीला भद्रा

विनायक चतुर्थीला भद्री सकाळी 8:13 वाजता सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 6:58 वाजता संपेल. ही भद्रा पृथ्वीवर वास करते, त्यामुळे भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य टाळावे. तुम्ही विनायक चतुर्थी पूजा, मंत्र जप इ. करू शकता.

Adhik Maas 2026: अधिक महिना संपताच पापांचा नाश आणि आत्मशुद्धीसाठी अवश्य करा धार्मिक उपाय

विनायक चतुर्थीचे महत्त्व

असे मानले जाते की या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. हा दिवस गुरुवारी येत असल्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. हिंदू धर्मात, गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवांचे गुरू असलेल्या गुरू ग्रहाचा दिवस मानला जातो. हा दिवस ज्ञान, धर्म, उपासना आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ मानला जातो. अनेक लोक या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेऊन उपवास करतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: विनायक चतुर्थीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी भगवान श्रीगणेशाची पूजा केल्याने विघ्नांचा नाश होतो, बुद्धी, यश आणि सुख-समृद्धीची प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: गणपतीला कोणता नैवेद्य अर्पण करावा?

    Ans: मोदक, लाडू, नारळ, गूळ, केळी आणि इतर सात्त्विक पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते.

  • Que: विनायक चतुर्थीला दुर्वा अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे?

    Ans: नवीन कामाची सुरुवात, शिक्षण, व्यवसाय, वाहन किंवा घराशी संबंधित शुभ कार्यांचा प्रारंभ या दिवशी करणे मंगलकारक मानले जाते.

Web Title: Vinayaka chaturthi june 2026 muhurat mode of worship and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Vinayaka Chaturthi

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.