आठवड्याचे राशीभविष्य काय आहे, नव्या वर्षात कोणत्या राशींना मिळणार लाभ
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष 2025 च्या पहिल्या आठवड्यात चंद्र मकर राशीत असेल आणि मंगळ चंद्रावर सातव्या राशीत असेल. यामुळे अत्यंत शुभ मानला जाणारा धन योग तयार होणार आहे. यामुळे हे नवीन वर्ष 4 राशींसाठी खूप लकी ठरणार आहे. पहिल्या आठवड्यापासून त्यांना अशा चांगल्या बातम्या मिळण्यास सुरुवात होईल, ज्याचा त्यांनी आधी विचारही केला नव्हता. त्यांना समाजात मान, प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे आणि नव्या वर्षाचा पहिला आठवडा कसा जाणार याबाबत सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock)
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष धमाकेदार असणार आहे. तुम्ही नियोजन करून काम करून पुढे जाल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या घरी एक छोटासा पाहुणे येण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता किंवा नवीन वाहन घरी आणू शकता. गेल्या काही वर्षात तुम्हाला जो त्रास झाला आहे, तो या नव्या वर्षात भरून निघेल आणि तुमचा मार्गही अनेक कामातून मोकळा होईल
2025 च्या पहिल्याच दिवशी होतोय ‘राजयोग’, 3 राशींचे चमकणार नशीब; वर्षभर पैशात लोळणार
कन्या रास
नव्या वर्षातील पहिला आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालविण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत सुखद आणि जवळच्या व्यक्तीच्या सान्निध्यात जाणार आहे
वृश्चिक रास
नवीन वर्षाचा पहिला आठवडा तुमच्यासाठी खूपच छान असेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे भाडे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही नवीन प्लॉट खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत 2-3 दिवस बाहेर जाण्याचा किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करू शकता. नव्या वर्षात तुमच्या जोडीदारासह तुमचे नातं अधिक घट्ट होईल आणि सुधारू शकते. तसंच प्रेम अधिक बहरेल आणि आपल्या जोडीदाराचा सहवास अधिक मिळेल. वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे.
Yearly Horoscope 2025: नव्या वर्षात कोणाला मिळणार नोकरी, घर, प्रेम? मेष ते मीन वार्षिक राशीभविष्य
धनु रास
2025 चा पहिला आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी चांगली माहिती घेऊन येईल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कर्जमुक्ती मिळण्यास सुरुवात होईल. कोर्टात प्रलंबित प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली निघू शकतात. व्यावसायिकांना नफा अपेक्षित आहे. तसंच तुमचं लग्न या आठवड्यात ठरू शकतं अथवा चांगली बातमी कानावर येऊ शकते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.