फोटो सौजन्य- pinterest
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा ( 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट) काही राशीच्या लोकांसाठी खूप खास राहणार आहे. या आठवड्यात ग्रहांच्या होणाऱ्या हालचालीमुळे काही योग तयार होणार आहेत. तसेच या आठवड्यामध्ये रक्षाबंधन देखील आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रह कन्या राशीत तर मीन राशीत स्थित असल्याने समसप्त योग तयार होईल आणि राहू कुंभ राशीत असल्याने षडाष्टक योग तयार होणार आहे. त्यासोबतच मिथुन राशीमध्ये गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. तसेच नवपंचम योग तयार होईल. ज्यामुळे काही राशीच्या लोकांना धन आणि पदोन्नती मिळू शकते. मेष ते मीन राशीपर्यंतच्या कोणत्या राशीच्या लोकांना हा आठवडा कसा राहील, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. कठोर परिश्रम आणि प्रयत्नांमुळे तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढताना दिसतील. करिअर किंवा व्यवसायात काही समस्या असल्यास ते दूर होतील. नवीन कामामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर जाऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल राहील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा ताण वाढलेला राहील. मित्रांकडून किंवा हितचिंतकांकडून अपेक्षित पाठिंबा मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल, ज्यामुळे आर्थिक असंतुलन निर्माण होऊ शकते. तुम्ही कोणत्याही परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असाल तर तुम्हाला चांगला यश मिळू शकते.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा आठवडा चांगला राहील. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
कर्क राशीच्या लोकांचा हा आठवडा सामान्य राहील. तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. नातेवाईकांकडून अपेक्षेपेक्षा कमी पाठिंबा मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या वाढू शकतात. गाडी चालवताना काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा.
सिंह राशीच्या लोकांचा हा आठवडा चांगला राहणार आहे. या आठवड्यात तुमची सर्व कामे पूर्ण होतील. सरकारी कामाशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात नवीन नोकरी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला राहील. या आठवड्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर समजुती मजबूत होईल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. जीवनामध्ये तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. लहान कामांसाठी देखील तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. कोणताही तणाव किंवा वाद टाळा, कारण काळजीपूर्वक निर्णय घेणे आणि संयम आवश्यक आहे. भागीदारी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
ऑगस्टचा पहिला आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. या आठवड्यामध्ये कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील. या आठवड्यात धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. मानसिक शांती मिळेल. या राशीच्या नोकरदार महिलांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. या आठवड्यात तुमचे नाते अधिक दृढ होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. नोकरी करणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या आईच्या आरोग्याबद्दल चिंतित राहाल. व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकते. या आठवड्यात मालमत्तेचे व्यवहार करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. यावेळी तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. या आठवड्यात तुमचे कठोर परिश्रम कमी होऊ देऊ नका. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांच्या मदतीने या आठवड्यात चांगले फायदे मिळू शकतात. तुम्हाला सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. कोणतेही काम करताना सावधगिरीने करा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम घ्यावे लागतील त्यामुळे तुमची या आठवड्यामध्ये धावपळ होऊ शकते. निष्काळजीपणामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांचा हा आठवडा अनुकूल राहील. व्यवसायात केलेला करार बराच काळ फायदेशीर ठरेल. करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईघाईमध्ये घेऊ नका. कोणताही जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळू शकते. अपचन किंवा गॅसशी संबंधित विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमच्या कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाऊ शकता. तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)