फोटो सौजन्य- pinterest
या महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या हालचाली आणि नक्षत्र यामुळे अनेक बदल होणार आहेत. या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन बदल, संधी आणि आव्हानांना तोंड द्यावे लागेल. तसेच या आठवड्यामध्ये तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. तर व्यावसायिक यश आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद देखील मिळेल. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा (11 ते 17) सर्वांसाठी खास राहील. या आठवड्यात स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमी, दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा कसा राहील, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्य, नातेसंबंध आणि मालमत्ता इत्यादींसाठी चांगला असणार आहे. एखाद्याशी वडिलोपार्जित मालमत्तेबद्दल किंवा इतर कोणत्याही जमीन-बांधणी इत्यादींबद्दल वाद असल्यास ते दूर होतील. तुम्हाला विविध क्षेत्रात यश आणि आदर मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळू शकते.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित स्वरुपाचा राहील. या आठवड्यामध्ये तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. जर तु्म्ही एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्यात फायदा होईल. आरोग्याची चिंता उद्भवू शकते. तुमच्यामधील मतभेद दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना काम करताना जास्त काळजी घ्यावी लागेल. यावेळी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक राहणार आहे. यावेळी तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते. मित्रांच्या मदतीने तुमच्या समस्येचे निराकरण होईल. तुम्हाला अचानक कुठूनतरी मोठी रक्कम मिळू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल. करिअर, व्यवसाय किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची आणि सामानाची चांगली काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. कोणत्याही फसवणुकीचा अवलंब न करता यश मिळवता येते. या आठवड्यात तुम्हाला हुशारीने पैशांची गुंतवणूक करावी लागते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. या आठवड्यात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. जमीन, इमारत किंवा वडिलोपार्जित मालमत्ता इत्यादींशी संबंधित बाबींसाठी आजचा दिवस चांगला राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप फायदेशीर राहणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा अधिक फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या आठवड्यात अपेक्षित फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा त्यांच्या कामाच्या ठिकाणी आदर वाढेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. कामावर तुमचे लक्ष केंद्रित करा. तुम्हाला कठोर मेहनत घेतल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतील. या आठवड्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे लागेल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नातेसंबंधामध्ये चढ उतार येऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला राहील. व्यवसायात गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहील. नवीन जमीन, इमारत आणि वाहन खरेदी करु शकता. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुमच्या घरगुती जीवनात सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. करिअरमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचा पूर्णपणे अभ्यास करा. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
कुंभ राशीच्या लोकांचा हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यामध्ये नातेसंबंधांत सुसंवाद चांगला राहील. परदेशात काम करणाऱ्यांना फायदा होईल. आरोग्य संतुलित राहील. कामाच्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करावे लागेल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुम्ही सर्जनशील कामात यशस्वी व्हाल. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. नातेसंबंध चांगले राहतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)