फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला नऊ ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील घर आणि स्थानानुसार त्याच्या जीवनावर परिणाम करतो. मान्यतेनुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य बलवान असतो त्या व्यक्तीला समाजात कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळते. मात्र तो कमकुवत असल्यास त्याचे उलट परिणाम सहज दिसून येतात. तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत असल्यास त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येऊ शकतात. तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत स्थितीत असल्यास कोणती लक्षणे जाणवतात, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्राच्या मते, ज्यावेळी सूर्य तूळ राशीमध्ये कमकुवत असतो किंवा एखाद्या अशुभ ग्रहाच्या युतीत असतो तेव्हा तो कुंडलीत कमकुवत मानला जातो. ज्यावेळी सूर्य सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या घरात असतो त्यावेळी त्याची स्थिती कमकुवत होते. ज्यावेळी सूर्य कमकुवत स्थितीत असतो त्यावेळी त्या व्यक्तीमधील आत्मविश्वास, स्वाभिमान आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.
जेव्हा सूर्य कमकुवत असतो तेव्हा व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो आणि त्याला प्रत्येक काम करण्यास भीती वाटते.
ज्यावेळी कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत असतो त्यावेळी व्यक्तीला निर्णय घेण्यात खूप अडचणी येतात.
कमकुवत सूर्यामुळे डोकेदुखी, हृदयरोग, डोळ्यांचे आजार आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
ज्यावेळी सूर्य कमकुवत असतो त्यावेळी यश मिळणे कठीण होते आणि नोकरी किंवा व्यवसायात समस्या येतात.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमकुवत असलेल्या व्यक्तीचे वडिलांशी संबंध बिघडू शकतात आणि त्याला वडिलांकडून पाठिंबा मिळत नाही.
ज्यावेळी सूर्य कमकुवत असतो तेव्हा त्या व्यक्तीला समाजात आदर मिळत नाही आणि अनेकदा अशा लोकांना अपमानाचा सामना करावा लागतो.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती कमकुवत असते त्या लोकांना नकारात्मक विचार, राग आणि मत्सर यासारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती कमकुवत असते त्या लोकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यासोबत
त्वचा आणि केसांच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
जर कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर अपघातांचा धोका होण्याची शक्यता जास्त असते.
कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती मजबूत होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे. यासाठी दररोज सूर्याला पाणी अर्पण करावे, सूर्यनमस्कार करणे, गायत्री मंत्राचा जप करणे, सूर्यदेवाची पूजा करणे, गरिबांना दान करणे, वडिलांचा आदर करणे, रविवारी उपवास करणे, आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे आणि दान करणे. या गोष्टी कराव्यात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)