Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी

गणेशयाग हा श्रीगणेशाच्या कृपेसाठी केला जाणारा विशेष धार्मिक विधी मानला जातो. गणेशयागाची पूजा, हवन, अथर्वशीर्षाचे आवर्तन, नवग्रह पूजन, आहुती, पूर्णाहुती आणि यागाची सांगता कशी केली जाते, जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By Dilip Bane
Updated On: Sep 22, 2026 | 04:24 PM
Ganeshyag, Ganesh chaturthi

Ganeshyag, Ganesh chaturthi

Follow Us
Follow Us:

1. गणेशयाग

गणेश हे ‘मूळारंभ आरंभ’ असे श्रेष्ठ दैवत असून, वेगवेगळ्या अवतारानुसार त्याच्या मुख्य तीन जयंत्या मानतात.

(१) वैशाखी पौर्णिमा
(२) भाद्रपद शुक्ल चतुर्थी
(३) माघ शुक्ल चतुर्थी

गणेश जयंतीनिमित्त तसेच अनेक गणेशभक्त काही विशेष उद्देशाने गणेशदेवतेप्रीत्यर्थ गणेशअथर्वशीर्षाची सहस्रावर्तने, अभिषेक व फलश्रुतीत सांगितल्याप्रमाणे चार द्रव्याने सहस्र संख्येनी आहुती देऊन जो याग करतात त्याला ‘गणेशयाग’ म्हटले जाते.कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, परीक्षेमध्ये हमखास यश मिळविण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, विद्या प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीगणेशाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला “गणेश याग” हे प्रभावी अनुष्ठान आहे.

2. प्रारंभिक विधी

गणेश यागात प्रथम नवपीठांची मांडणी करून प्रधान संकल्प करावा.प्रारंभी गणेशाचे पूजन करून पुण्याहवाचन, मातृकापूजन, आयुष्यमंत्रजप, नांदीश्राद्ध, आचार्यादिवरण, दिग्रक्षणम, पंचगव्यकरण, भूमीपूजन करून ब्रह्मादि वास्तु मंडलाची स्थापना करावी.५७ देवता असलेल्या सर्वतोभद्र मंडलाची स्थापना करावी. ५१ देवतेच्या क्षेत्रपाल मंडलाची स्थापना करून त्यानंतर प्रधान मंडल असलेल्या गणेशभद्र मंडलाची स्थापना करावी.

3. गणेशभद्र मंडल व अभिषेक

९७ देवतांच्या गणेशभद्र मंडलाची स्थापना झाल्यानंतर त्यावर प्रधान कलश स्थापन करावा.त्यावर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, यंत्र, कुलदेवता यासहित श्रीगणेशाच्या चांदीच्या मूर्तीची/प्रतिमांची प्राणप्रतिष्ठा करून पंचामृत स्नान घालून पूजा करावी.श्रीगणेशाला पाण्याने किंवा दूधाने अथर्वशीर्षाचे १ हजार आवर्तनाचा अभिषेक करावा. षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी. दूर्वा अर्चन करावे.

4. नवग्रह मंडल व होम

त्यानंतर अग्नीस्थापना करून ४४ देवतांच्या नवग्रह मंडलाची स्थापना करावी. शेवटी रुद्रपूजन करावे.अग्नीवर संस्कार करावे. ब्रह्मपीठाची पूजा करावी. हवन सुरू करावे.हवन निर्विघ्नतेसाठी गणेश मंत्राने वराहुती देण्याची रूढी आहे. ही आहुती दिल्यानंतर नवग्रहांसाठी समिधा, तूप, भात व काही वेळेला तीळसुद्धा दिले जातात.

  • सूर्याला—रुई
  • चंद्राला—पळस
  • मंगळाला—खैर
    बुधाला—आघाडा
  • गुरूला—पिंपळ
  • शुक्राला—उंबर
    शनीला—शमी
  • राहूला—दूर्वा
  • केतूला—दर्भ
या प्रमाणे समिधा सांगितलेल्या आहेत.

5. मुख्य हवन

नवग्रह होम संपन्न होतो. मग मुख्य हवनाला प्रारंभ होतो.लाह्या, दूर्वा, समिधा आणि मोदक यांच्या आहुती दिल्या जातात.अथर्वशीर्षाच्या एका आवर्तनाचे १० भाग केले आहेत. प्रत्येक भागाच्या शेवटी ‘स्वाहा’ असे म्हणून द्रव्याची आहुती दिली जाते.या प्रमाणे १ आवर्तन झाल्यावर एका गुरुजींकडून त्या द्रव्याच्या १० आहुती पूर्ण होत असतात. या प्रमाणे हिशोब करून एक हजार आहुत्या पूर्ण केल्या जातात.उपदेवता म्हणून ऋद्धि, सिद्धि यांना तसेच वाहन म्हणून मूषकाला तुपाच्या आहुती देऊन मुख्य हवन संपन्न होते.यानंतर प्रायश्चित्त होम संपन्न होतो.

6. हवनाचा पुढील विधी

प्रारंभी गणेशाचे हवन करून नवग्रह मंडलाचे हवन करावे. मग अथर्वशीर्षाचे १०० आवर्तनाचे हवन करावे.त्यानंतर पीठदेवता, यंत्रदेवता सहित स्थापित मंडल देवतांचे हवन करावे.गुग्गुल होम, सर्षप होम, लक्ष्मी होम झाल्यानंतर स्थापित देवतांचे उत्तरांग पूजन करावे.अग्नीला स्वीष्टकृत द्यावे. दाही दिशा तसेच स्थापित मंडल देवता यांचे बलीपूजन करावे.नंतर क्षेत्रपाल पूजन करून शेवटी यागाची महाआहुती म्हणजेच पूर्णाहुती द्यावी.

7. पूर्णाहुती व क्षेत्रपाल पूजन

पूर्णाहुती यज्ञात उडिद व भाताच्या रूपातून दिली जाते.क्षेत्रपाल याचा अर्थ जागेचे रक्षण करणारी देवता असा आहे.यजमान कुटुंबावरून हा बली ओवाळून तीन/चार रस्ते जेथे मिळतात अशा ठिकाणी अथवा कम्पाउंड बाहेर ठेवला जातो.बळी नेणाऱ्याच्या मागोमाग यजमान पिवळी मोहरी टाकत व यजमानपत्नी पाणी शिंपडत दारापर्यंत जातात.

8. यागाची सांगता

त्यानंतर स्नान करून किंवा हातपाय धुवून येतात व अग्नीसमोर बसतात.शिल्लक राहिलेल्या तुपाची आहुती द्यावी. भस्मधारण, संस्त्रवप्राशन करून ब्रह्मापूजन करावे.यानंतर फलरूपाने कर्माचे फल यजमानांना दिले जाते. त्यावेळी आशीर्वादपर मंत्र म्हटले जातात.सर्व ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा.या गणेश यागानिमित्त गुरुजींना यथाशक्ती भूमी दान, तीळ दान, तूप दान, गाय दान, सोने दान तसेच सप्त धान्य दान द्यावे.गणपतीला नैवेद्य दाखवावा. आरती करून सर्वांनी गजाननाची क्षमा मागावी. शेवटी गणेशाची स्तुती, प्रार्थना करून यागाची सांगता करावी.

Web Title: What is ganesh yag know its significance ritual puja havan and complete procedure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganesh Festival
  • ganesh utsav

संबंधित बातम्या

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
1

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष
2

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
3

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
4

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.