Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shardiya Navratri 2025 : काळरात्री देवीचा जागर म्हणजे काय? मुंबईच्या कुशीत दडलाय गुढ रहस्याचा थरार

मुंबईतल्या एका प्रसिद्ध ठिकाणी या देवीचा जादर उत्सव केला जातो. अनेक भक्तांच्या अंगात येणारं वारं इथे शांत करण्यात येतं असा समज आहे. हा काळरात्रीचा उत्सव कसा साजरा केला जातो ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 25, 2025 | 03:36 PM
Shardiya Navratri 2025 : काळरात्री देवीचा जागर म्हणजे काय? मुंबईच्या कुशीत दडलाय गुढ रहस्याचा थरार
Follow Us
Close
Follow Us:

“सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते”

नवरात्र म्हणजे देवीचा जागर ! नऊ दिवस देवी आईच्या वेगवेगळ्या रुपाची केली जाणारी पूजा. कधी चंद्रघंटा कधी शैलपुत्री कधी अंबिका या अशा विविध रुपांची आराधना आणि महात्म्य या नवरात्रीत सांगितलं जातं. त्यातीलच देवीचं रौद्ररुप म्हणून जिला पाहिलं जातं म्हणजे काळरात्री देवी. काळसर निळा वर्णाची, चेहऱ्यावर रौद्रभाव, डोळ्यात अंगार असं हे देवी पार्वती रुप म्हणजे काळरात्री देवी. रथसप्तमीला या देवीला विशेष महत्व दिलं जातं. काळरात्रीचा जागर आणि तिच्या पूजेबाबत अनेक गूढ आहेत. मुंबईतल्या एका प्रसिद्ध ठिकाणी या देवीचा जादर उत्सव केला जातो. अनेक भक्तांच्या अंगात येणारं वारं इथे शांत करण्यात येतं असा समज आहे. हा काळरात्रीचा उत्सव कसा साजरा केला जातो ते जाणून घेऊयात.

मुंबईतलं हे असं एक ठिकाण ज्याचं नवरत्रीत रुपच पालटलेलं असतं. या ठिकाणी होणाऱ्या काळरात्रीचा उत्सव अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. हे ठिकाण म्हणजे घाटकोपरमधील भटवाडी. भटवाडीच्या महाकालीचा उत्सव मुंबईत प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील याबाबत अनेक रिल्स व्हायरल होत आहेत.

Navratri 2025: दुसऱ्या माळेचा रंग लाल; धैर्य आणि शक्तीची प्रतिनिधित्व करणारी माता दुर्गेच काय आहे महत्व ?

काय आहे काळरात्रीचा उत्सव ?

माता महाकाली सेवा मंडळ संचलित अखिल भटवाडी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने  शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येतं. घाटकोपर पश्चिम भटवाडी स्थित “श्री क्षेत्र माता महाकाली मंदिर” हे मुंबईतील प्राचीन व जागृत देवस्थान असल्याची मान्यता आहे. फार पुर्वी श्रीमहाकालीच्या साक्षात्कारानंतर सद्गुरू श्री स्वामी शामानंदांनी या मंदिराची उभारणी केली होती. इथल्या जुन्या जाणत्या स्थानिक रहिवाशांच्या माहितीप्रमाणे शंभराहून अधिक वर्ष या मंदिराचा आणि त्याचसोबत रुढी-परंपरा विधी उत्सवाचा इतिहास आहे.

सद्गुरू श्री स्वामी शामानंदांनी सुरु केलेल्या शारदीय नवरात्रौत्सव, मकरसंक्रांत व इतर धार्मिक विधी अनुष्ठानाची परंपरा आजही इथे संपुर्ण श्रद्धेने जोपासली जाते. शारदीय नवरात्रौत्सवातील काळरात्र उत्सव हा सर्व भावीकांचा विशेष लक्षवेधी उत्सव म्हणून प्रख्यात आहे. नवरात्रौत्सवाच्या महासप्तमी दिनी मध्यरात्री ठिक बारा वाजता हा विधी संपन्न होतो. नवरात्रातील महासप्तमी दिनी सायंकाळी आई महाकालीचे हवन अनुष्ठान संपन्न होते.

सांज आरती संपन्न झाल्यावर लगबग सुरु होते ती काळरात्र उत्सवाची. मध्यरात्री ठिक बारा वाजता मंदिर प्रांगणात गडद अंधार केला जातो. आई महाकाली तथा क्षेत्र रक्षक श्री वेताळ यांचीपूजा केली जाते. त्याचबरोबर एक महत्वाचा विधी होतो तो म्हणजे कोहळा बलिदान विधी. लोक कल्याणार्थ श्रीमहाकालीला साकडं घातलं जातं आणि रथसप्तमीला तिचा जागर केला जातो.

भुत-यक्ष-गण यांच्या वेशभूषा केलेली लहान मुलं यज्ञ मंडपाजवळ सुसज्ज होतात. आणि ठिक बारा वाजता मंदिराच्या गाभाऱ्यातून प्रज्वलित दिवट्या हाती घेऊन पुरुष सदस्य बाहेर पडून यज्ञ मंडपाकडे धाव घेतात व वाजत गाजत दिवट्या नाचवत यज्ञ मंडपाला प्रदक्षिणा घालतात. सोबतच भुत-यक्ष-गण यांच्या वेशभूषा केलेली लहान मुलंही त्यात सामील होतात. अंगी शिवकळा संचार झालेले असंख्य भाविक स्री पुरुष यज्ञ मंडपात वारे खेळतात. हा विधी पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी होते. ठराविक वेळेनंतर पुन्हा सर्वत्र प्रकाश रोशनाई होते. अंती आदिशक्ती आई महाकालीचा जयजयकार होतो आणि कार्यक्रमाची सांगता होते.या उत्सवात देवीला आवाहन केलं जातं. होम हवन करुन देवीला प्रसन्न केलं जातं.

या उत्सावासाठी येणाऱ्य़ा भाविकांसाठी मंडळाकडून देखभाल केली जाते. त्यांना हवं नको ते पाहिलं जातं. अशी धारणा आहे की इथे भाविकांच्या अंगात देवीचं वारं येतं. ते वारं शांत झाल्यावर या भाविकांना मंडळाचे सेवेकरी सुरक्षितपणे घरी पोहोचवतात. हे जागृत देवस्थान असल्या कारणाने या देवस्थानाची ख्याती मुंबईभर पसरलेली आहे. मात्र असं असलं तरी या ठिकाणी तंत्र मंत्र, काळी जादू किंवा जादू टोणा सारख्य़ा प्रकारांना थारा दिला जात नाही. केवळ काळरात्री देवीचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी येत्या रविवारी रथसप्तमीला काळरात्रीचा देवीचा जागर करण्यात येणार आहे.

Sharadiya Navratri 2025 : तिसऱ्या माळेचा रंग निळा; पुरणानुसार ‘असं’ आहे …

 

Web Title: What is the awakening of the goddess kaalratri the thrill of a mysterious secret hidden in bhatwadi in ghatkopar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • dharm
  • navrashtra news
  • Navratri 2025

संबंधित बातम्या

Margashirsha Purnima: करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय
1

Margashirsha Purnima: करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय

Navpancham Yog: 12 वर्षांनंतर बुध आणि गुरु तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब
2

Navpancham Yog: 12 वर्षांनंतर बुध आणि गुरु तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

Guruwar Upay: गुरुवारी एक रुपयाचे नाणे आणि हळदीचे करा ‘हे’ उपाय, नोकरीमध्ये मिळेल अपेक्षित यश
3

Guruwar Upay: गुरुवारी एक रुपयाचे नाणे आणि हळदीचे करा ‘हे’ उपाय, नोकरीमध्ये मिळेल अपेक्षित यश

Zodiac Sign: दत्त जयंतीच्या दिवशी वृषभ आणि कर्क राशीसह देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद
4

Zodiac Sign: दत्त जयंतीच्या दिवशी वृषभ आणि कर्क राशीसह देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.