Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotiba story: ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! अनेकांचे कुलदैवत असणाऱ्या ज्योतिबाची कथा

महाराष्ट्रातील लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले ज्योतिबा हे अनेक कुटुंबांचे कुलदैवत मानले जाते. “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!” हा जयघोष केवळ एक परंपरा नसून, भक्ती, विश्वास आणि एकात्मतेचे प्रतीक आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 26, 2026 | 10:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी डोंगरावरती बसलेलं प्रसिद्ध ज्योतिबा देवस्थान
  • ज्योतिबा देवस्थानाचे धार्मिक महत्त्व
  • काय आहे  ज्योतिबाची कथा
 

 

महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांचे कुलदैवत मानले जाणारे ज्योतिबा हे भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!” हा जयघोष आजही यात्रांमध्ये, उत्सवांमध्ये आणि भक्तांच्या ओठांवर घुमताना ऐकू येतो. या जयघोषामागे दडलेली आहे एक अद्भुत पौराणिक कथा.

ज्योतिबाची पौराणिक कथा

महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी डोंगरावरती बसलेलं ज्योतिबा देवस्थान हे अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानलं जातं. ज्योतिबा या देवतेलाच ज्योतिर्लिंग, केंदारलिंग, रवळनाथ आणि सौदागर अशा विविध अंगांनी उल्लेखतात. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश जमदग्नी ऋषी आणि बारा सूर्यांचा तेजःपुंज अवतार आहे. यातील केदारलिंग हे भगवान शिवाचं रुप मानलं जातं आणि ते अन्याय आणि दृष्ट शक्तीचं नाश करणारे म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीशी ज्योतिबांचा घनिष्ट संबंध मानला जातो.

zodiac sign:  बुधादित्य योग आणि वृद्धी योगामुळे या राशींच्या लोकांना होणार फायदा

ज्योतिबा मंदिराची रचना

या मंदिरांची रचना पारंपरिक आणि भव्य आहे. उंच डोंगरावर बसलेलं हे मंदिर दगडी बांधकामाचं असून त्यावरती सुंदर कोरीव काम दिसतं. मंदिरात ज्योतिबा देवाची मूर्ती असून ती काळ्या पाषाणातील आहे. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिर आणि दीपमाळा दिसतात. येथील वातावरण प्रसन्न आणि आध्यात्मिक वाटतं. डोंगरावरूनच आसपासचा परिसर खूपच सुंदर दिसतो. त्यामुळे धार्मिकतेसोबत निसर्गसौदर्यांचा देखील आनंद मिळतो. येथील मंदिराचं सर्वांत मोठ वैशिष्ट्य म्हणजे येथे होणारा गुलाल उत्सव. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. याला चैत्र यात्रा असे म्हणतात. या काळात लाखो भाविक ज्योतिबांच्या दर्शनासाठी येतात आणि संपूर्ण मंदिर परिसर गुलालाने गुलाबी रंगांत न्हाहून निघतो. “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!” या जयघोषाने वातावरण दुमदुमून जातं. हा उत्सव महाराष्ट्रातील सर्वांत वेगळ्या आणि रंगीबेरंगी धार्मिक परंपरापैकी एक मानला जातो.

ज्योतिबा देवाची पौराणिक कथा अशी सांगितली जाते की, पूर्वी या भागात रत्नासूर आणि कोल्हासूर असे दोन दैत्य लोकांना त्रास देत होते. यावेळी देवी महालक्ष्मी दृष्टांचा नाश करण्यासाठी भगवान शिवाला मदतीसाठी पाचारण केलं त्यावर भगवान शिवांनी ज्योतिबा रुपात अवतार घेतला. आपल्या सहकार्यासह या दैत्यांवरती युद्ध करून पराभव मिळवला या विजयामुळे परिसरात शांतता प्रस्थापित झाली आणि ज्योतिबा हे रक्षकदेव म्हणून प्रसिद्ध झाले.

Numberlogy:  मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

ज्योतिबा देवस्थानाचे धार्मिक महत्त्व

ज्योतिबा देवस्थानाचे धार्मिक महत्त्व खूप मोठं आहे येथे भक्त येऊन आपल्या इच्छा व्यक्त करतात आणि अडचणी दूर व्हाव्यात म्हणून यासाठी प्रार्थना करतात. विशेषतः नवस पूर्ण करण्यासाठी लोक येथे आवर्जुन येतात. असे मानले जाते की, ज्योतिबा देव आपल्या भक्ताचं रक्षण करतात आणि त्यांना संकटांपासून दूर ठेवतात. ज्योतिबा मंदिर हे केवळ धार्मिक स्थान नसून श्रद्धा, परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीच प्रतीक आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला भक्ती, ऊर्जा आणि समाधानाचा एक वेगळाचं अनुभव मिळतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्योतिबा कोण आहे

    Ans: ज्योतिबा हे महाराष्ट्रातील एक पूजनीय देवता असून अनेक कुटुंबांचे कुलदैवत मानले जातात. त्यांना भगवान शिवाचे रूप मानले जाते.

  • Que: ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” याचा अर्थ काय?

    Ans: या जयघोषाचा अर्थ — ज्योतिबाच्या कृपेने सर्व काही चांगले होवो. हा भक्ती, विश्वास आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे.

  • Que: ज्योतिबाची कथा काय सांगते?

    Ans: ज्योतिबाने राक्षसांचा नाश करून धर्माचे रक्षण केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. त्यामुळे ते रक्षणकर्ता देव मानले जातात.

Web Title: What is the story of jyotiba temple in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
2

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास
4

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.