Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Navami 2025: रामनवमी कधी आणि का साजरी केली जाते? जाणून घ्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व

भगवान रामाची जयंती म्हणून साजरी होणारी रामनवमी यावर्षी रविवार, 6 एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी देशभरात विविध ठिकाणी प्रभू राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 31, 2025 | 03:58 PM
माथेरानमध्ये श्रीराम नवमी उत्सवाचे ग्रामस्थ मंडळाकडून आयोजन…

माथेरानमध्ये श्रीराम नवमी उत्सवाचे ग्रामस्थ मंडळाकडून आयोजन…

Follow Us
Close
Follow Us:

रामनवमी हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो देशभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा सण रविवार, 6 एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

राम नवमी का साजरी करतात

रामनवमी हा भगवान श्री राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला होता. त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास ठेवतात, रामायणाचे पठण करतात आणि भजन आणि कीर्तनातून भगवान श्रीरामाची स्तुती करतात.

Gauri Tritiya Vrat 2025: कधी आहे गौरी तृतीया व्रत, काय आहेत या व्रताची वैशिष्ट्ये

राम नवमी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी शनिवार, 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:26 वाजता सुरू होईल आणि रविवार, 6 एप्रिल रोजी 7:22 वाजता समाप्त होईल. अशा प्रकारे, रामनवमी रविवार, 6 एप्रिल साजरी केली जाईल.

ब्रह्म मुहूर्त: सकाळी 04:34 ते 05:20

विजय मुहूर्त: दुपारी 02:30 ते 03:20 पर्यंत

संध्याकाळ: 06:41 ते 07:03

निशीथ काळ: सकाळी 12:00 ते 12:46 पर्यंत

रामनवमी ते अक्षय्य तृतीयेपर्यंत एप्रिल महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या

रामनवमीचे महत्त्व

रामनवमी हा केवळ सण नसून तो सत्य, धर्म आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. भगवान श्री राम यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य आणि धर्माचे पालन केले. या दिवशी व्रत करून रामकथा श्रवण केल्याने नकारात्मकता संपून मनाला शांती मिळते. रामनवमीला विशेष पूजा आणि विधी केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते.

रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्री रामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला, कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील
नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो, रामनवमी फक्त
भारताच नाही तर जगभरात साजरी केली जाते. रामनवमी हा वाईटावर विजयाचे प्रतीक आहे. भगवान रामाचे जीवन सत्य, कर्तव्य आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यांना आदर्श पुत्र, राजा, पती आणि योद्धा मानलं जातं, जे निस्वार्थता आणि त्यागाचे प्रतीक आहेत. राम
नवमी एक धार्मिक उत्सव नसून भक्तीगीत आणि दानधर्माचा शुभ काळ आहे. या दिवशी गरजूंना अन्न, कपडे आवश्यक वस्तू दान करणे शुभ मानले जाते.

पूजा कशी करावी?

जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते. पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या. यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा. त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात. मग चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर अक्षता, फूल अशी पूजेची सामग्री अपर्ण करावी. मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालिसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करावे. तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदर कांडमधील पाठ आणि हनुमान चालिसा यांचे पठणही करू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: When and why is ram navami celebrated understanding its cultural and religious significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग
1

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व
2

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश
3

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या
4

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.