Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026: होळी आणि धुलिवंदन आहेत दोन वेगळे दिवस, करू नका गल्लत आणि जाणून घ्या या दिवसांमधील फरक

फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. होळीला होलिकोत्सव देखील म्हटले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. हे दोन्ही सण वेगवेगळे आहेत. होळी आणि धुलिवंदनामधील फरक काय आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 23, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • होळी आणि धुलिवंदन कधी आहे
  • होळी आणि धुलिवंदनामधील फरक
  • काय आहे होळीची कथा
 

 

होळी आणि धुलिवंदन हे सलग दोन दिवस साजरे होणारे पण अर्थाने भिन्न असे सण आहेत. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी ही वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी पेटवली जाते, तर धुलीवंदन हा होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंग, राख किंवा माती लावून आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. यावेळी होळी सोमवार, 2 मार्च रोजी आहे तर मंगळवार, 3 मार्च रोजी धुलिवंदन आहे.
होळी आणि धुलिवंदन हे दोन वेगळे दिवस असूनही खूप जण आजूनही या दिवसांमध्ये गल्लत करतात. म्हणूनच होळी आणि धुलिवंदन यातील नेमका फरक काय आणि हा दिवस साजरा करण्यामागील कारण काय ते जाणून घेऊया

होळी म्हणजेच होलिकादहन या दिवशी होळी पेटवली जाते. हा दिवस फाल्गुन पौर्णिमेला येतो. होळी पेटवून नकारात्मक शक्तींचा नाश होतो असा समज आहे. या दिवशी रंग खेळले जात नाहीत. गावाबाहेर होळीच्या दिवशी लाकूड एकत्र केले जातात आणि त्याला नारळाचं तोरण बांधल जातं. होळीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. उत्तम आरोग्यासाठी, संतती प्राप्तीसाठी, कामातील अडथळे दूर करण्यासाठी होळीसमोर गाऱ्हाण देखील घातले जाते. अनेक ठिकाणी होळी पेटवल्यानंतर बोंबा मारण्याची देखील पद्धत आहे. बोंबा मारत प्रदक्षिणा घालून होळीला नारळ देखील अर्पण केला जातो. होळी साजरी करण्यामागे एक आख्यायिका फार प्रचलित आहे. ही कथा आहे भक्त प्रल्हादाची आणि हिरण्यकश्यपुची.

Holashtak 2026: या दिवसांमध्ये करू नका विवाह ते गृहप्रवेश, अन्यथा वाढू शकतात अडथळे

होळीची कथा

हिरण्यकश्यपु हा अत्यंत अहंकारी असा राजा होता. तो स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ मानत असे. लोकांनी केवळ आपलीच पूजा करावी असे त्याला कायम वाटे. त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. हिरण्यकश्यपुला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याच्या विष्णूभक्तीवर चिडून प्रल्हादला मारण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. प्रल्हादला मारण्यासाठी त्याने आपली बहीण होलिकेला बोलावले. होलिकेला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. साक्षात ब्रम्ह देवांना प्रसन्न करून तिने हे वरदान मागितले होते. होलिकेच्या संरक्षणासाठी तिला तो वरदान साक्षात ब्रम्ह देवांनी दिला होता. प्रल्हादला मारण्याच्या हेतूने ती ज्यावेळी त्याला मांडीवर घेऊन चितेवरती बसली त्यावेळी मात्र ती त्या आगीत जळून भस्म झाली. आपल्या वरदानाचा दुरुपयोग केल्यामुळे तिला हे मरण आलं होतं त्यामुळेच या होलिकेत वाईट गोष्टींचा नाश होतो, असा समज आहे.

Holi 2026: लाल, पिवळा की हिरवा? तुमच्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ, जाणून घ्या

धुलिवंदन म्हणजे काय

होळीनंतर येणारा दिवस म्हणजे धुलिवंदन याला अनेक ठिकाणी धुळवड असेही म्हणतात. हा सण रंगांने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी पेटवलेल्या धुळीची राख अंगांला लावून मगच धुळवड खेळली जाते. हा दिवस हिरण्यकश्यपुचा वध आणि प्रल्हादाच रक्षण म्हणजे सत्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. शिवाय काही ठिकाणी राधा कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून या दिवसाला मान आहे. सर्व भेदभाव विसरून लोक एकत्र येतात आणि रंगांच्या माध्यमातून एकमेंकांच्या आयुष्यात आनंद भरतात. थोडक्यात, धुलिवंदन हा कडू आठवणी होळीत जाळून नवीन आनंदी सुरुवात करण्याचा सण आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: होळी आणि धुलिवंदन हे वेगवेगळे दिवस आहेत का?

    Ans: होय. होळी आणि धुलिवंदन हे सलग दोन वेगवेगळे दिवस मानले जातात. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते, तर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.

  • Que: धार्मिक दृष्ट्या दोन्ही दिवसांचे महत्त्व काय?

    Ans: होळी: नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचे स्वागत करण्याचा दिवस. धुलिवंदन: प्रेम, बंधुता आणि आनंद साजरा करण्याचा दिवस.

  • Que: पूजा आणि परंपरा कशा वेगळ्या आहेत?

    Ans: होळीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा, होलिका दहन आणि प्रदक्षिणा केली जाते. धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळणे, गोडधोड खाणे आणि सामाजिक उत्सव साजरा केला जातो.

Web Title: Holi 2026 what is the difference between holi and dhuli vandana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • holi

संबंधित बातम्या

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
1

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Dussehra 2026: दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त का मानतात? काय आहे यामागील कारण आणि धार्मिक महत्त्व
2

Dussehra 2026: दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त का मानतात? काय आहे यामागील कारण आणि धार्मिक महत्त्व

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या
3

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
4

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.