Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिकी यात्रेमुळे विठ्ठल चरणी सव्वापाच कोटींचे दान, गेल्या वर्षीपेक्षा दीड कोटींची वाढ

कार्तिकी यात्रा ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रेसाठी लाखो भाविक ठिकठिकाणाहून या यात्रेमध्ये सहभागी होतात. या यात्रेमध्ये यंदा उत्पन्नामध्ये मागील वर्षीपेक्षा दीड कोटींची वाढ झालेली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 12, 2025 | 03:17 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:
  • कार्तिकी यात्रा कधी आहे
  • कार्तिकी यात्रेमुळे विठ्ठल चरणी किती दान आले
  • गेल्या वर्षीपेक्षा दीड कोटींची वाढ

 

कार्तिकी यात्रा 2025

पंढरपूर, कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी ५ कोटी १८ लाख रुपयांचे दान केले. सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्त निवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ कोटी ६१ लाख रुपये उत्पन वाढल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

Kendra Trikon Rajyog: 12 वर्षांनंतर बृहस्पतिमुळे तयार होणार केंद्र त्रिकोण राजयोग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

कार्तिकी यात्रा ही एक धार्मिक यात्रा असून जी प्रामुख्याने श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो तर पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल पूजन केले जाते. यावर्षी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या संजीवन समाधी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

वारकरी संप्रदायातील उत्पन्न

वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी कार्तिकी यात्रेला यंदा पावसाचा फटका बसला. यंदा यात्रेला भाविकांची संख्या कमी झाली. यात्रा काळात २२ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ४८ लाख ८ हजार २८९ रुपये अर्पण केले, तर मंदिर समितीला १ कोटी २७ लाख १९ हजार ५२० रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाले. याशिवाय अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावखे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून ६ लाख ७० हजार ९०६ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे विविध माध्यमांतून समितीच्या तिजोरीत ५ कोटी १८ लाख उत्पन्न जमा झाल्याची माहिती शेळके यांनी दिली आहे.

लाडू प्रसाद विक्रीतून ५४ लाख जमा

लाडू प्रसाद विक्रीतून ५४ लाख १६ हजार ५०० रुपये, भक्तनिवास शुल्क म्हणून ७१ लाख ५९ हजार ९१० रुपये, तर हुंडीपेटीत १ कोटी ७७ लाख १५ हजार २२७ रुपये जमा झाले आहेत. याशिवाय देवापुढील पूजेतून ५० हजार रुपयांचे उत्पन्न समितीला प्राप्त झाले आहे. तसेच देवाला यंदाच्या यात्रेत तीन लाख ३६ हजार ८७६ रुपये सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले आहेत.

Shani Margi 2025: शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांना 2026 पर्यंत राहावे लागणार सावध

भाविकांना सोईसुविधा उपलब्ध करणार

मंदिर समितीला मागील वर्षीच्या कार्तिकी यात्रेत ३ कोटी ५७ लाख ४७ हजार ३२२ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. एक प्रकारे यंदा यामध्ये १ कोटी ६१ लाख रुपयांची वाढ होत हे ५ कोटी १८ लाख रुपये झाले आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी सांगितले.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कार्तिकी यात्रा कधी आहे

    Ans: कार्तिकी यात्रेचा मुख्य कालावधी 12 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान आहे

  • Que: या वर्षी दानाची रक्कम किती आहे

    Ans: यावर्षी दानाची रक्कम सव्वापाच कोटीं इतकी आहे

  • Que: गेल्या वर्षीपेक्षा कितीने वाढ झाली आहे

    Ans: गेल्या वर्षीपेक्षा दीड कोटींची वाढ झालेली आहे

Web Title: When is the kartiki yatra donate five and a half crores at the feet of vitthal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • dharm
  • Kartiki Yatra
  • pandharpur

संबंधित बातम्या

Kendra Trikon Rajyog: 12 वर्षांनंतर बृहस्पतिमुळे तयार होणार केंद्र त्रिकोण राजयोग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब
1

Kendra Trikon Rajyog: 12 वर्षांनंतर बृहस्पतिमुळे तयार होणार केंद्र त्रिकोण राजयोग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Shani Margi 2025: शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांना 2026 पर्यंत राहावे लागणार सावध
2

Shani Margi 2025: शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांना 2026 पर्यंत राहावे लागणार सावध

Utpanna Ekadashi: उत्पन्न एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित करा ‘हे’ उपाय, आर्थिक अडचणी होतील दूर
3

Utpanna Ekadashi: उत्पन्न एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित करा ‘हे’ उपाय, आर्थिक अडचणी होतील दूर

Zodiac Sign: शशि योगाचा वृश्चिक राशीसह या राशींच्या लोकांना होईल फायदा
4

Zodiac Sign: शशि योगाचा वृश्चिक राशीसह या राशींच्या लोकांना होईल फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.