फोटो सौजन्य- pinterest
कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी व्रत पाळले जाते. हे व्रत आज म्हणजे शनिवार, 21 जून रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास साधकाला आशीर्वाद प्राप्त होतात, असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात योगिनी एकादशीला काही महत्त्वाच्या नियमांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या नियमांचे पालन केल्याने साधकाला उपवासाचे अपेक्षित फायदे मिळतात, अशी मान्यता आहे. योगिनी एकादशीला काय खावे, जाणून घ्या नियम.
असे म्हटले जाते की, योगिनी एकादशीचे व्रत हे 88 हजार ब्राह्मणांना जेवण देण्यासारखे आहे. या दिवशी तुळशीची पाने तोडू नये, असे काही नियम सांगण्यात आले आहे. जर चुकूनही तुळशीची पाने तोडली गेल्यास त्याचा अशुभ परिणाम होतो, असे मानले जाते. परंतु तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे फायदेशीर ठरेल.
योगिनी एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते. योगिनी एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचे सेवन करु नये. तसे न केल्यास उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही, असे मानले जाते. या दिवशी उडीद, मसूर, हरभरा, गाजर, कोबी, पालक इत्यादी गोष्टींचे सेवन करु नये. जर तुम्ही चुकूनही या गोष्टी सेवन केल्यास तुम्हाला त्याचे अशुभ परिणाम मिळू शकतात.
एकादशीच्या दिवशी अन्न खाण्यास निषिद्ध मानले जाते. या दिवशी फळ खाऊन उपवास करणे फायदेशीर मानले जाते. जे साधक उपवास ठेवतात त्यांनी फक्त फळे खावेत. जसे की, केळी, संत्री, द्राक्षे, डाळिंब, पपई इत्यादी सर्व प्रकारच्या पदार्थांचे तुम्ही सेवन करु शकता. या नियमांचे पालन केल्यास व्यक्तीला सर्व संकटापासून सुटका होते, असे मानले जाते.
एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी गरजूवंतांना अन्नदान करावे. तसेच तहानलेल्या व्यक्तीला पाणी दिल्यानेही पुण्य मिळते. तसेच उपवासाच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तीला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे द्यावेत. तसेच पीठ, तांदूळ, खीर आणि शक्य असल्यास चांदीची नाणी दान करणे देखील फायदेशीर मानले जाते. साधकाच्या जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळते आणि धनप्राप्ती होण्याची देखील शक्यता वाढते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)