फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये दाम्पत्याने एकत्र बसणे ही फक्त परंपराच नाही तर याला शास्त्रात अध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व देखील आहे. वैवाहिक जीवनात सुख समृद्धीच नाही तर आनंदाचे प्रतीक मानले जाते. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचे मिलन नाही तर दोन आत्म्यांचे पवित्र बंधन मानले जाते. असे म्हटले जाते की, दाम्पत्याने एकत्र पूजा केली की, शक्ती आणि भक्ती एकत्रितपणे परिपूर्णता प्राप्त करतात. जर कोणीही एकट्याने पूजा केल्यास ती अपूर्ण मानली जाते.
मान्यतेनुसार, दोघांनी एकत्र केलेल्या पूजेचे पुण्य दुप्पट आणि समान प्रमाणात मिळते, असे मानले जाते. शास्त्रामध्ये उल्लेख केल्यानुसार, पतीने कधीही पत्नीशिवाय पूजा करू नये, कारण असे केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. हीच गोष्ट पत्नीलाही लागू होते.
हिंदू धर्मामध्ये स्त्रीला देवीचे रुप म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांचे रुप मानले जाते. तर पुरुषामध्ये शंकर, विष्णू यांचे रुप मानले जाते. म्हणून या शक्तींशिवाय कोणतीही कामे पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. पूजा करतेवेळी एकत्र बसणे हे शिव आणि शक्ती यांच्यातील सुसंवादाचे प्रतीक मानले जाते. जसे भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपात आहे. असे म्हटले जाते की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वळणावर खास करुन धार्मिक कार्य करताना पुरुष आणि स्त्री दोघांचेही सहकार्य, संतुलन असणे गरजेचे मानले जाते.
अशी मान्यता आहे की, दोघांनी एकत्र पूजा केल्याने अध्यात्मामध्ये असलेल्या बंधात वाढ होते. यामुळे नात्यामधील सुसंवाद, प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो. एकत्र पूजा केल्याने दोघांमधील फरक कमी होऊन त्यांच्यामधील विश्वास वाढतो. यासोबतच त्यांच्यामधील एकमेंकाबद्दल असलेला आदर आणि सहकार्याची भावना व्यक्त देखील केली जाते.
वैदिक परंपरेनुसार, कन्यादान, यज्ञ, हवन, नामकरण आणि अन्नप्रासन यासारख्या महत्त्वाच्या संस्कारांमध्ये पत्नीने पतीसोबत बसणे बंधनकारक आहे. यामधून दोघांमधील संयुक्त सहभाग आणि दोघांवर असलेली जबाबदारी दिसून येते. विशेषतः होमहवन, पूजा, यज्ञ, व्रत इत्यादी धार्मिक विधी करताना दोघांनी एकत्र करण्याची परंपरा आहे तसेच यावेळी पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसण्याची प्रथा आहे. यामागे काही धार्मिक श्रद्धादेखील आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार, उजवी बाजू ही शक्ती आणि आईचे स्थान असलेले दर्शवते तर पत्नीला शक्तीचे रुप मानले जाते. दरम्यान जेवणे, झोपणे आणि वयस्कर व्यक्तीच्या किंवा वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घेणे यांसारख्या गोष्टींमध्ये पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसणे शुभ मानले जाते. कारण डावी बाजू ही प्रेमाची आणि हृदयाचे प्रतीक असलेली मानली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)