फोटो सौजन्य- pinterest
सर्व ग्रह आपल्या वेळेनुसार आपल्या राशींमध्ये बदल करतात. ग्रहांच्या हालचालींचा काही राशींवर शुभ योगाचा प्रभाव 12 राशींच्या लोकांवर पडतो. या योगांपैकी एक योग म्हणजे गजकेसरी योग. हा योग चंद्र आणि गुरु यांच्या संक्रमणामुळे तयार होतो. यांच्या संक्रमणामुळे करिअरमध्ये यश मिळणे आणि तणाव दूर होणे यांसारख्या गोष्टी उद्भवतात. ज्योतिष शास्त्राच्या मते, परत एकदा हा योग तयार होत आहे. मंगळवार 24 जून रोजी रात्री 11:45 चंद्र मिथुन राशि मध्ये आपले संक्रमण करेल. या राशीमध्ये पहिल्यापासूनच गुरु ग्रह उपस्थित आहे. हा योग 27 जून पर्यंत राहणार आहे. यावेळी गजकेसरी योग 54 तास राहणार आहे. या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोग शुभ असणार आहे याचा त्यांना फायदा होईल. परिवारातील मतभेद दूर होतील. परदेश प्रवास करू शकता. ज्या लोकांचे विवाह अडकले आहेत त्यांचे विवाह होतील. या योगाचा परिणाम म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि मन शांत राहील. या लोकांनी दान करणे शुभ मानले जाते. तुम्ही करिअर मध्ये काही नवीन योजना आखू शकता. नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील. तसेच घरामध्ये शुभ कार्याचे आयोजन केले जाईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
गजरकेसरी योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची कला दुसऱ्याच्या समोर येईल. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या समस्या संपून जातील. एखादा जुना आजार ठीक होईल. पुन्हा जात मानसन्मान मिळेल यादरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. मिथुन राशीच्या लोकांना लेखनामध्ये रुची वाढेल. या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळतील. हे लोक सरकारी नोकरी करत आहेत त्यांना नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.
तूळ राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा अनुकूल परिणाम जाणवू शकतो. गजकेसरी योगामुळे तुळ राशीच्या लोकांच्या नात्यांमध्ये गोडवा राहील. जर न्यायालयामध्ये एखादी जुनी दीर्घकाळापासून चालत असल्यास ती संपेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते किंवा एखाद्या ठिकाणी नवीन ऑफर मिळू शकते. तुम्हाला आई-वडील यांच्यामुळे तुम्ही चिंतेत असाल तर तुमची चिंता दूर होईल. आत्मविश्वास वाढेल. तसेच दीर्घकाळापासून तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)