फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. आषाढ कृष्ण एकादशी तिथीच्या दिवशी योगिनी एकादशीचे व्रत पाळले जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात, असे म्हटले जाते. मान्यतेनुसार, हे व्रत पाळल्याने ८८ हजार ब्राह्मणांना भोजन देण्याइतकेच फळ मिळते. योगिनी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्रतामुळे पापांचा नाश होत नाही तर एखाद्या व्यक्तीला शाप मिळाला असेल तर तोही नष्ट असतो, अशी मान्यता आहे. योगिनी एकादशीचे व्रत कधी आहे, जाणून घ्या
योगिनी एकादशीचे व्रत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाणार आहे. पंचांगानुसार ही तिथी शनिवार, 21 जून रोजी सकाळी 7.19 वाजता सुरु होणार आहे आणि त्या तिथीची समाप्ती रविवार, 22 जून रोजी सकाळी 4.28 वाजता होईल. उद्यतिथीनुसार शनिवार, 21 जून रोजी योगिनी एकादशीचे व्रत पाळले जाते. योगिनी एकादशीच्या दिवशी अश्विनी नक्षत्र आणि अतिगंड योग तयार होणार आहे. यावेळी अमृत काळ दुपारी 1.12 ते 2.40 वाजेपर्यंत असेल.
योगिनी एकादशीच्या सकाळी लवकर ब्रम्ह मुहूर्तावर उठून आपले सर्व आवरुन झाल्यानंतर पिवळे कपडे परिधान करा.
त्यानंतर गंगाजलाने देव्हारा शुद्ध करुन घ्या नंतर भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करा
दिवा, उदबत्ती, फुले, तुळशी, पंचामृत या गोष्टींनी भगवान विष्णूंची पूजा करा
पूजा झाल्यानंतर “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्रांचा जप करा आणि भगवान विष्णूंचे सहस्रनाम वाचा.
दिवसभर फळे खाऊन निर्जल उपवास करा.
संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे फायदेशीर मानले जाते.
हिंदू धर्मामध्ये योगिनी एकादशीच्या व्रत हे पवित्र मानले जाते. या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पाळल्या जाणाऱ्या या व्रताला मोक्षदायिनी एकादशी म्हणून देखील ओळखले जाते. हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो. पौराणिक कथेनुसार, या व्रताचे पालन केल्याने शापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते, अशी मान्यता आहे. जे भक्त या व्रताच्या दिवशी भक्तीभावाने हे व्रत पाळतात त्यांना सर्व आजांरापासून आणि कामात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्तता होते, असे देखील मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)