Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 August History: आज क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ३ ऑगस्टचा इतिहास..

3 August History: थोर स्वतंत्रसेनानी आणि समाजसुधारक कांतिसिह नाना पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या कार्यांचा आढवा आणि आजच्या दिवशी जगात आणि देशात घडलेल्या घडामोडींबद्दला जाणून घेऊया..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 03, 2026 | 11:06 AM
नाना पाटील

नाना पाटील

Follow Us
Follow Us:

3 August History: स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि ‘प्रतिसरकार’चे प्रणेते म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्म आज ३ ऑगस्ट १९०० मध्ये सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र येथे झाला. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात तीव्र लढा पुकारत १९४२ च्या ‘छोड़ो भारत’ आंदोलनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सातारा जिल्ह्यात ब्रिटिशांची सत्ता पूर्णपणे उखडून लावून त्यांनी ‘प्रतिसरकार’ (समानांतर सरकार) ची यशस्वी स्थापना केली, ज्याला लोक प्रेमाने ‘पत्री सरकार’ म्हणूनही ओळखत असत. ते केवळ राजकीय नेते नव्हते, तर शेतकरी, कामगार आणि उपेक्षितांचे खरे कैवारी होते; त्यांनी गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘न्यायदान मंडळ’ स्थापन करून स्वतः न्यायव्यवस्थाही चालवली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते कम्युनिस्ट पक्षाशी जोडले गेले आणि १९५७ व १९६७ मध्ये लोकसभेचे खासदार म्हणून संसदेत पोहोचले.६ डिसेंबर १९७६ रोजी या महान जननेत्याचे निधन झाले, परंतु त्यांचे क्रांतिकारी विचार आणि कार्य आजही देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

३ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1678 : अमेरिकेने बनवलेले पहिले जहाज ग्रीफॉन लाँच करण्यात आले.
  • 1783 : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले.
  • 1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.
  • 1914 : हिटलरने बव्हेरियाचा राजा लुडविग यांच्याकडे सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आणि त्याला नियुक्त करण्यात आले.
  • 1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
  • 1948 : भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
  • 1960 : नायजेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1994 : संगीतकार अनिल बिस्वास यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केला.
  • 1994 : साध्या आणि गोड कविता आणि सूक्ष्म आणि मार्मिक वर्णनात्मक लेखांच्या माध्यमातून हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारने विशेष पुरस्कार जाहीर केला आहे.
  • 2000 : मल्याळम दिग्दर्शक शाजी एन करुण यांना फ्रेंच सरकारने नाइट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2004 : राज्यपाल मुहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

३ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1984 : ‘सुनील छेत्री’ – भारतीय फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1886 : ‘मैथिलिशरण गुप्त’ – हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 1964)
  • 1898 : ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1966)
  • 1900 : ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1976)
  • 1916 : ‘शकील बदायूँनी’ – गीतकार आणि शायर यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1970 – मुंबई)
  • 1924 : ‘लिऑन युरिस’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 2003)
  • 1939 : ‘अपूर्व सेनगुप्ता’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1955 : ‘चंद्रशेखरन मोहन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1956 : ‘बलविंदरसिंग संधू’ – 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1960 : ‘गोपाल शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1977 : ‘सुनील ग्रोव्हर’ – भारतीय अभिनेता आणि कॉमेडियन यांचा जन्म.
2 August Dinvishesh: पुलेला गोपीचंद यांना राजीव गांधी पुरस्कार प्राप्त; जाणून घ्या २ ऑगस्टचा इतिहास…

३ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1929 : ‘एमिल बर्लिनर’ – फोनोग्राफ चे शोधक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1851)
  • 1930 : ‘व्यंकटेश बापूजी केतकर’ – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1854)
  • 1957 : ‘देवदास गांधी’ – पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1900 – दरबान, दक्षिण अफ्रिका)
  • 1993 : ‘स्वामी चिन्मयानंद सरस्वती’ – अध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 8 मे 1916)
  • 2007 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 जून 1933)
Today in History : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती; जाणून घ्या १ ऑगस्टचा इतिहास..

Web Title: 3 august history krantisinh nana patil birth anniversary dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

RPF Raising Day : कोट्यवधी प्रवाशांचे सुरक्षा कवच! जाणून घ्या ‘रेल्वे संरक्षण दल’ स्थापना दिनाचा इतिहास, महत्त्व आणि विशेष मोहिमा
1

RPF Raising Day : कोट्यवधी प्रवाशांचे सुरक्षा कवच! जाणून घ्या ‘रेल्वे संरक्षण दल’ स्थापना दिनाचा इतिहास, महत्त्व आणि विशेष मोहिमा

World  Cleanup Day: एस्टोनियातील ‘या’ एका कल्पनेने बदलले जग; जाणून घ्या 20 सप्टेंबरचे महत्त्व आणि इतिहास
2

World Cleanup Day: एस्टोनियातील ‘या’ एका कल्पनेने बदलले जग; जाणून घ्या 20 सप्टेंबरचे महत्त्व आणि इतिहास

Country Music Day: 17 सप्टेंबरलाच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय कंट्री म्युझिक दिन? जाणून घ्या रंजक इतिहास
3

Country Music Day: 17 सप्टेंबरलाच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय कंट्री म्युझिक दिन? जाणून घ्या रंजक इतिहास

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
4

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.