Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्यमालेत परग्रहीय ‘घुसखोर’! नासाचा ‘Interstellar Object A11pl3Z’ बद्दल धक्कादायक खुलासा

interstellar object A11pl3Z : आपल्या सूर्यमालेत एक परग्रहीय 'घुसखोर' दाखल झाला असून, ही घटना खगोलशास्त्राच्या इतिहासात केवळ तिसऱ्यांदाच घडली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 04, 2025 | 09:01 AM
Alien intruder in solar system NASA reveals interstellar object A11pl3Z

Alien intruder in solar system NASA reveals interstellar object A11pl3Z

Follow Us
Close
Follow Us:

interstellar object A11pl3Z : आपल्या सूर्यमालेत एक परग्रहीय ‘घुसखोर’ दाखल झाला असून, ही घटना खगोलशास्त्राच्या इतिहासात केवळ तिसऱ्यांदाच घडली आहे. A11pl3Z असे नाव असलेल्या या आंतरतारकीय वस्तूने जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे वेगवेगळे निरीक्षण करताना नासाने आणि युरोपियन स्पेस एजन्सीने (ESA) या घटनेला दुर्मिळ आणि ऐतिहासिक असे संबोधले आहे.तिसरा ‘आंतरतारकीय’ पाहुणा

A11pl3Z ही वस्तू सूर्यमालेबाहेरून आलेली आंतरतारकीय वस्तू (Interstellar Object) आहे. अशी वस्तू जी आपल्या सूर्यमालेत कोणत्याही ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाने बांधली गेली नाही आणि जी एका वेगळ्या आकाशगंगेतील किंवा ताऱ्यांच्या प्रणालीतील असण्याची शक्यता आहे. ESA च्या निवेदनानुसार, या वस्तूचा मार्ग अत्यंत असामान्य असून, तिची गतीही साधारण खगोलीय वस्तूंप्रमाणे नाही. तिच्या कक्षेची विक्षिप्तता (eccentricity) 6 ते 11.6 दरम्यान असल्याचे निरीक्षणात आले आहे, जे अत्यंत टोकाचे मानले जाते. ही गती आणि दिशा सूचित करतात की A11pl3Z ही वस्तू केवळ आपल्या सूर्यमालेतून फिरत आहे आणि नंतर परत आंतरतारकीय अवकाशात निघून जाणार आहे.

नासाची महत्त्वपूर्ण भूमिका

या वस्तूचा सर्वप्रथम शोध नासाच्या ATLAS (Asteroid Terrestrial-impact Last Alert System) ने लावला. ATLAS हे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या धोकादायक लघुग्रहांचा आणि वस्तूंचा शोध घेण्यासाठी वापरले जाणारे अलर्ट सिस्टम आहे. या घडामोडीनंतर, जगभरातील शास्त्रज्ञ  व्यावसायिक आणि हौशी खगोलशास्त्रज्ञ – यांनीही A11pl3Z वर लक्ष केंद्रित केले आहे. ESA विविध दुर्बिणी आणि जागतिक नेटवर्कच्या साहाय्याने या वस्तूचे बारकाईने निरीक्षण करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : थायलंडच्या राजकारणात नाट्यमय वळण; सत्ता वाचवण्यासाठी निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांची तिरपी चाल अन्…

सध्या कुठे आहे A11pl3Z?

नासाच्या अहवालानुसार, A11pl3Z ही वस्तू सध्या गुरू ग्रहाच्या कक्षेत आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ती सूर्याच्या अत्यंत जवळ पोहोचेल, जे सुमारे 1.35 खगोलीय युनिट्स (200 दशलक्ष किमी) एवढे अंतर आहे. ही वस्तू पृथ्वीच्या दिशेने येत नसल्यामुळे कोणताही धोका नाही, पण ती मंगळाच्या तुलनेने जवळून जाणार असल्याने ही शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाची वैज्ञानिक संधी असणार आहे.

विज्ञानासाठी ऐतिहासिक क्षण

आंतरतारकीय वस्तूंचे निरीक्षण करणे हे खूपच कठीण आणि दुर्मिळ असते. याआधी केवळ दोनच अशा वस्तू – ʻOumuamua (2017) आणि 2I/Borisov (2019) – या ओळखल्या गेल्या होत्या. त्यामुळे A11pl3Z ही केवळ तिसरी ओळख पटलेली आंतरतारकीय वस्तू ठरली आहे. शास्त्रज्ञांचे मत आहे की आपल्या सूर्यमालेत अजूनही अशा अनेक आंतरतारकीय वस्तू प्रवेश करत असतील, पण त्यांचा वेग, आकार आणि लहानपणामुळे आपण त्या ओळखू शकत नाही. त्यामुळे A11pl3Z हे एक दुर्मिळ ‘कोस्मिक पाहुणे’ असल्याचे मानले जात आहे.

नवीन ज्ञानाचा दरवाजा उघडणारी घटना

या वस्तूच्या निरीक्षणातून बाहेरील आकाशगंगा, ताऱ्यांच्या निर्मितीचे अवशेष, आणि वेगवेगळ्या ग्रह प्रणालींच्या विकासाबाबतची महत्त्वाची माहिती मिळू शकते. A11pl3Z ही वस्तू कुठून आली, तिचा रासायनिक किंवा खनिजीय संरचना कशी आहे, याचा अभ्यास भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी अमूल्य ठरेल. नासाने आणि ESA ने यावर सुरू केलेल्या संशोधनाकडे आता संपूर्ण वैज्ञानिक जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारतात जन्म घेणार पुढील दलाई लामा’; चीनचा जळफळाट, उत्तराधिकाऱ्याच्या मुद्द्यावरून ‘India vs China’ जुंपली

A11pl3Z

A11pl3Z या आंतरतारकीय धूमकेतूच्या आगमनामुळे सूर्यमालेतील आणि अवकाशातील अनोख्या घटकांचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही घटना केवळ एक खगोलीय अद्भुतता नसून, आपल्या विश्वाच्या रहस्यांचा थेट शोध घेण्याची एक अपूर्व संधी आहे.

Web Title: Alien intruder in solar system nasa reveals interstellar object a11pl3z

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • navarashtra special story
  • science news
  • special story

संबंधित बातम्या

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
1

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
2

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
3

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत…  मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
4

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.