भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 उत्साहाने साजरी केली जात आहे (फोटो - AI)
Dr. Babasaheb Ambedkar jayanti : भारतीय लोकशाहीच्या पायाभरणीतील तेजस्वी शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती. त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करत आहे. अन्याय, अस्पृश्यता आणि विषमतेच्या अंधःकारातून समाजाला प्रकाशाच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण केला.
स्वातंत्र्यानंतर राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्यांची चौकट नसून, ती समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची पवित्र शपथ आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी ही राज्यघटना त्यांच्या दूरदृष्टीची जिवंत साक्ष ठरते. दलित, शोषित आणि वंचितांच्या अश्रूंना शब्द देत, त्यांच्या हक्कांसाठी लढताना त्यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र दिला. शिक्षण, कामगार हक्क आणि स्त्रीसमानतेसाठी त्यांनी केलेले कार्य समाज परिवर्तनाचे दीपस्तंभ ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली. (Dinvishesh)
14 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
14 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
14 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






