Chhatrapati Sambhaji Maharaj's birth anniversary is celebrated on May 14 every year
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : आज छत्रपती संभाजी महाराज यांची ३६८ वी जयंती देशभरात श्रद्धा आणि अभिमानाने साजरी केली जात आहे. केवळ मराठा इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्या महान योद्ध्यांमध्ये त्यांचे स्थान सर्वोच्च आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच मराठी, संस्कृत, फारसी आणि हिंदी या भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्यांची विद्वत्ता केवळ राजकीय किंवा युद्ध कौशल्यातच नव्हे, तर साहित्यिक क्षेत्रातही प्रखरपणे दिसून येते. ‘बुद्धिभूषण’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला असून, तो त्यांच्या विद्वानतेचे प्रतीक मानला जातो.
१६८१ साली छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा कारभार हाती घेतला. केवळ २४ व्या वर्षी राजसिंहासनावर विराजमान होऊन त्यांनी मुघल, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज अशा बलाढ्य शत्रूंशी लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने अनेक लढायांमध्ये विजय मिळवला. त्यांचे शासनकाल तितकाच आव्हानात्मक होता. औरंगजेबाने स्वतः दक्षिणेकडे मोहीम राबवत संभाजी महाराजांना नष्ट करण्याचे ध्येय ठरवले होते. मात्र, संभाजी महाराजांनी पाच वर्षांहून अधिक काळ मुघल सैन्याला रोखून धरले. त्यांच्या धैर्यामुळेच मराठा साम्राज्याचे अस्तित्व टिकून राहिले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘दो भाई दोनो तबाही’; पाकिस्तानला धूळ चारायला भारत-रशिया सज्ज, ‘S-500’ मुळे भरली धडकी!
१६८९ मध्ये संभाजी महाराजांना मुघलांनी कपटाने कैद केले. औरंगजेबाने त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणला. मात्र, संभाजी महाराजांनी धर्मांतरास ठाम नकार देत आपला धर्म, संस्कृती आणि अस्मिता यांचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना अमानुष छळ सहन करावा लागला आणि शेवटी त्यांना अत्यंत क्रूरपणे शहीद करण्यात आले. त्यांचे बलिदान आजही धर्मनिष्ठा, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेमाचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते. त्यांनी दाखवलेले शौर्य केवळ तलवारीच्या बळावर नव्हते, तर त्यामागे होती सत्यासाठी आणि न्यायासाठी झगडण्याची अमर प्रेरणा.
आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना, केवळ पुष्पांजली अर्पण करून विसरणे हा त्यांचा अपमान ठरेल. त्यांच्या शिकवणी जीवनात उतरवणे हीच खरी सार्थ श्रद्धांजली ठरेल. त्यांचे तेजस्वी जीवनचरित्र नवीन पिढीला नीतिमूल्ये, धैर्य आणि स्वाभिमानाची शिकवण देते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीत सत्तापालट होणार? ‘या’ देशांनी आखली एर्दोगानच्या पाय उताराची योजना, वाचा सविस्तर
संभाजी महाराज हे केवळ मराठ्यांचे नाही, तर संपूर्ण भारताचे धर्मवीर आणि राष्ट्रवीर होते. त्यांच्या बलिदानाने भारताच्या इतिहासात अमिट ठसा उमटवला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांचा स्वीकार करून राष्ट्रसेवेसाठी कटिबद्ध होणे आवश्यक आहे.