तुर्कीत सत्तापालट होणार? 'या' देशांनी आखली एर्दोगानच्या पाय उताराची योजना, वाचा सविस्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अंकारा: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाच वातावारण निर्माण झाले होते. जागतिक स्तरावर अनेकांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आणि भारताला पाठिंबा दर्शवला होता. यादरम्यान मुस्लिम देश तुर्कीने पाकिस्तानला लष्करी पाठिंबा दर्शवला होता. यामुळे मोठा खळबळ उडाली होती. दरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. तुर्कीमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या पायउताराची योजना आखली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही योजना देशात नव्हे, तर बाहेरच्या काही महान देशांनी कडून आखली जात आहे. यापूर्वी 2016 मध्ये देखील सत्तापालटाचा प्रयत्न झाला होता, परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. फेतुल्लाह (FETO) या दहशतवादी संघटनने हा प्रयत्न केला होता. दरम्यान या संघटनेच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. तुर्कीमध्ये नुकत्याच झालेल्या छाप्यांदरम्यान विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करणा्ऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला होता. यासाठी परेदशी मदत घेण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, एर्दोगानच्या सत्तापालटाची योजना FETO आणि पाच देशांनी आखली असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये बोस्निया, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडिनिया, अल्बेनिया या देशांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. तुर्कीच्या तापस संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, FETO संघटनेने विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करण्याची योजना आखली होती. या विद्यार्थ्यांना बाल्कनमध्ये नेण्यात येणार होते. धार्मिक शिक्षणाच्या आड विद्यार्थ्यांना फसवण्यात येत होते. या विद्यार्थ्यांना परदेशात नेण्यात आले आणि तिथे त्यांना सात दिवस एर्दोगानच्या विरोधातील विचारसरणीशी ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
अल्बेनियाला गेलेल्या एका विद्यार्थ्याने कबूल केले की, जुलै २०२४ मध्ये धार्मिक शिक्षणाचे आमिष त्याला दाखवण्यात आले, पण तिथे पोहोचल्यानंतर त्यांना समजले की, हे सर्व FETO च्या लोकांनी आयोजित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की पोलिसांनी ४७ प्रदेशांमध्ये छापे टाकले. यामध्ये २२५ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच नुकतेच तुर्की पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केले असून एर्दोगान विरोधात कट रचणाऱ्या आणखी काही लोकांना अटक केली आहे. तपासादरम्यान तुर्की पोलिसांना आढळून आले की FETO संघटना बऱ्याच काळापासून विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून होती आणि त्यांना हळूहळू एर्दोगानच्या विरोधात भडकवले जात होते.
तुर्की पोलिसांच्या रिपोर्टनुसार FETO संस्थेने एर्दोगान विरोधात सुरु असलेल्या मोहीमेसाठी छोट्या रोख व्यवहाराच्या माध्यमातून निधी उभारला होता. यामध्ये परेदशी नेटवर्क्स कडून याला पाठिंबा मिळत होता. फेतुल्लाह गुलान यांच्या निधनानंतर ही संघटना अधिक तीव्र झाली होती. एर्दोगान विरोधात या संघटनेने निषेध सुरु केला होता. याचा परिणाम संस्थेच्या खालच्या पातळीपर्यंत पोहोचला होता.
२०१६ नंतर तुर्कीने FETO विरोधात मोहीम सुरू केली. FETOचे अनेक नेटवर्क आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आले आहे. परंतु अजूनही FETO चे काही स्लीपर सेल लष्कर सक्रिय आहे.