
Constitution Day 2025 Which is the most powerful article in the Indian Constitution Know its true power
Constitution Day 2025 : २६ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही (Democracy) इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला आहे. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने जगातील सर्वात मोठे आणि सखोल संविधान औपचारिकरित्या स्वीकारले. या दिवसाला संविधान दिन (Constitution Day) म्हणून ओळखले जाते. जवळपास २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांच्या कठोर परिश्रमांनंतर भारतीय संविधानाला अंतिम स्वरूप मिळाले. आजही हा दिवस नागरिकांना लोकशाहीची जाणीव करून देतो आणि संविधानाच्या मूल्यांबद्दल पुन्हा विचार करायला लावतो.
भारतीय संविधानात असंख्य कलमे आहेत, ज्यांचे महत्त्व आणि उपयोग वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. अनेक कलमे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करतात, तर काही कलमे केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्तेचे संतुलन राखतात. परंतु या सर्वांमध्ये कलम ३६८ हे एक अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली कलम मानले जाते. कारण हे कलम भारताच्या संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार प्रदान करते. संविधानातील बदल, सुधारणांचे प्रस्ताव किंवा परिस्थितीनुसार आवश्यक बदल करण्यासाठी कलम ३६८ हा मुख्य आधार आहे.
तथापि, या कलमाची शक्ती असीमित नाही. १९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक केशवानंद भारती प्रकरणात ‘मूलभूत संरचना सिद्धांत’ मांडण्यात आला. या सिद्धांतानुसार, संसदेला संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार असला तरी ती संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल करू शकत नाही. म्हणजेच संघराज्यवाद, धर्मनिरपेक्षता, कायद्याचे राज्य, न्यायपूर्ण प्रशासन, न्यायालयीन स्वातंत्र्य इत्यादी मुख्य तत्त्वे बदलली जाऊ शकत नाहीत. हा निर्णय भारतीय लोकशाहीच्या सुरक्षेसाठी एक भक्कम ढाल बनला.
हे देखील वाचा : Science News : विज्ञानात 100 वर्षानंतर क्रांती! ब्लॅकहोलच्या टक्करीनंतर ऐकू आला ‘रिंगडाउन’ सिग्नल; समजून घ्या यामागील तथ्य
याचबरोबर संविधानातील इतर काही कलमेही अत्यंत महत्वाची आहेत. उदाहरणार्थ कलम ३२, ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘संविधानाचे हृदय आणि आत्मा’ असे म्हटले आहे. या कलमामुळे नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मोडीत निघाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार मिळतो. त्याचप्रमाणे कलम २१ हे जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार देणारे व्यापक कलम आहे, ज्याचा अर्थ न्यायालयांनी काळानुसार विस्तृत केला. कलम ३५६ हे केंद्राला आवश्यक प्रसंगी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार देते.
संविधान दिन का महत्त्वाचा आहे, याचे उत्तरही या तरतुदींमध्ये दडलेले आहे. संविधान दिन भारतीय लोकशाहीचा आत्मा जपणारा दिवस आहे. देशभरातील शाळा, सरकारी विभाग, संस्था आणि नागरिक या दिवशी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करतात, लोकशाही मूल्यांची पुनःप्रतीज्ञा करतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह संविधान निर्मात्यांच्या कार्याचा सन्मान करतात.
हे देखील वाचा : Utqiagvik : अमेरिकेचा ‘हा’ भाग आता अंधारात बुडाला; २ महिने उगवणारच नाही सूर्य, जाणून घ्या यामागील रंजक वैज्ञानिक कारण
२६ नोव्हेंबर हा संविधान स्वीकारण्याचा दिवस असला तरी ते अधिकृतपणे २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले, ज्यामुळे भारत प्रजासत्ताक बनला. परंतु संविधान स्वीकारण्याच्या दिवसाचे महत्त्व ओळखून २०१५ पासून हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. नागरिकांना आपल्या हक्कांची जाणीव करून देणे, संविधानाचे मूल्य समजावणे आणि लोकशाही अधिक मजबूत करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Ans: कलम ३६८ हे सुधारणा अधिकारामुळे सर्वात शक्तिशाली मानले जाते.
Ans: कारण ते नागरिकांना मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देते.
Ans: दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी, संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ.