Science News: विज्ञानात 100 वर्षानंतर क्रांती! ब्लॅकहोलच्या टक्करीनंतर ऐकू आला 'रिंगडाउन' सिग्नल; समजून घ्या यामागील तथ्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Science News : विश्वातील सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली वस्तू असलेल्या कृष्णविवरांनी पुन्हा एकदा विज्ञानक्षेत्रात ऐतिहासिक खळबळ उडवली आहे. LIGO-Virgo-KAGRA वैज्ञानिक टीमने नोंदवलेल्या ताज्या निरीक्षणात प्रथमच कृष्णविवरांच्या(Black hole) टक्करनंतर निर्माण होणारा अंतिम कंपनाचा आवाज “रिंगडाउन” अत्यंत स्पष्टपणे नोंदवला गेला आहे. हा शोध केवळ एक निरीक्षण नसून, १०० वर्षे जुने वैज्ञानिक रहस्य उकलण्याची किल्ली आहे. यामुळे दोन महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या सिद्धांतांची एकाच वेळी पुष्टी झाली आहे.
अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी गुरुत्वीय लहरींचा सिद्धांत मांडताना असा अंदाज व्यक्त केला होता की, जेव्हा दोन कृष्णविवरे एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यातून निर्माण होणारा कंपन एक “शेवटचा प्रतिध्वनी” म्हणजेच रिंगडाउन असेल. तो आवाज पहिल्यांदाच इतका स्वच्छ आणि जास्त अचूकतेने नोंदवला गेला आहे. हा आवाज म्हणजे कृष्णविवर अंतिमतः स्वतःला स्थिर करताना कंपत असलेले विश्वाचे कंप आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप
स्टीफन हॉकिंग यांनी १९७१ मध्ये असा दावा केला होता की कृष्णविवर कधीही आकाराने घटत नाही, ते केवळ वाढतात.
नवीन अभ्यासांमध्ये उघड झाले आहे की:
या निष्कर्षामुळे हॉकिंगचा “Area Theorem” पुन्हा सिद्ध झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shanghai Airport : ‘अरुणाचल चीनचा भाग’ वाद पुन्हा उफाळला; शांघाई एअरपोर्टवर भारतीय महिलेला तब्बल 18 तास ठेवले ताब्यात
GW250114 नावाच्या सिग्नलच्या मदतीने वैज्ञानिकांना कृष्णविवरांचे:
अत्यंत अचूकतेने मोजता आली.
हे रेकॉर्डिंग आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट कृष्णविवर टक्कर संकेत ठरले आहे.
अभ्यासानुसार, टकरानंतर जे कृष्णविवर तयार झाले ते एक “केर ब्लॅक होल” आहे म्हणजेच स्वतःच्या अक्षाभोवती अतिवेगाने फिरणारे कृष्णविवर, जसे १९६० मध्ये गणितज्ञ रॉय केर यांनी भाकीत केले होते.
या अभ्यासामुळे आता स्पष्ट झाले आहे की कृष्णविवरांचे कंपन म्हणजे विश्वाची भाषा आहे. आगामी दशकात LIGO तंत्रज्ञान आणखी सुधारेल आणि कृष्णविवरांचे अनेक अज्ञात रहस्ये उलगडतील अशी आशा वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.
Ans: तो गुरुत्वीय लहरींमधून मोजला जातो.
Ans: कारण प्रथमच आइन्स्टाईन आणि हॉकिंग दोघांचे सिद्धांत सिद्ध झाले.
Ans: ते वेगाने फिरणारे केर ब्लॅक होल होते.






