भारतीय संविधानाने काय दिले ? प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गावकऱ्यांना मिळालं हटके उत्तर
पोलादपूर/ संदिप जाबडे : देश आणि राज्यपातळीवर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशातच पोलादपूर तालुक्यात पुरस्कार वितरणाचा समारंभ करण्यात आला होता. पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धारवली येथे 67 व्या प्रजासत्ताक दिनी धारवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाने आपल्याला काय दिले ? या विषयावर ऍड अनुजा संजय जैतपाल यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
संविधानातील विविध पैलू मांडताना स्वातंत्र, समता, बंधुता या विषयवार आधारित भारतीय संविधानानाने महिलांना दिलेल्या मूलभूत अधिकारांची माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. भारतीय संविधानानाने भारतीय नागरिकांना दिलेल्या समतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार,व्यक्तीस्वातंत्र्याची हमी, मतदानाचा अधिकार, वारसा हक्क यांवर विस्तृत मार्गदर्शन केले. राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा मान राखणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असल्याची जाणीव प्रसंगी करून दिली.
SBI on Ladki Baheen Yojna: लाडकी बहीण योजनेचा परिणाम अर्थसंकल्पावर दिसणार; SBIचा राज्य सरकारला इशारा
डॉ. आशिष संजय जैतपाल यांनी भारतीय संविधानातून आपण काय घेतले? या विषयावर मार्गदर्शन करताना स्वातंत्रपूर्व काळातील भारताची परिस्थिती व भारत स्वातंत्र झाल्यावर राज्यव्यवस्था चालवताना निर्माण झालेल्या आव्हानांची विस्तृत माहिती दिली. यावेळी समाजभूषण,बहुजन सेवारत्न, ग्रामरत्न पुरस्कार, आरोग्य सेवारत्न, धारवली भूषण, ग्रामभूषण, शासकीय अधिकारी सेवारत्न पुरस्कार, शिक्षण रत्न सेवारत्न, उत्कृष्ट सेवा भावी संस्था पुरस्कार, कलारत्न आदी पुरस्कराचे वितरण करण्यात आले.प्रजासत्ताक दिनानिमित्त धारवली ग्रामपंचायत आयोजित कार्यक्रमास प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल लिमिटेडचे पराग हेलेकर,डॉ. दीपक कांबळे, सरपंच विलास सकपाळ, विभाग प्रमुख उमेश कालेकर, उपसरपंच प्रल्हाद चाचले,ग्राम पंचायत अधिकारी उमेश मनवे, मुख्याध्यापक प्रदीप पवार, पोलीस पाटील रोशन सकपाळ, तंटा मुक्ती अध्यक्ष सिद्धार्थ सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य आणि देश पातळीवर संविधानावरुन आरोप प्रत्यारोपांची मालिका पाहायला मिळत आहेत. संविधानातील कायदे सुव्यस्था यांच्याबाबतीत राजकीय वर्तुळात चर्चा कायमच होत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत पोलापूर येथे भारतीय संविधानाने आपल्याला काय दिले ? या विषयावर व्याख्यान देण्यात आलं आहे. सध्य़ा संविधानावरुन जे राजकारण सुरु आहे, त्याधर्तीवर सामान्यांना देशाचा एक नागरिक या नात्य़ाने संविधानाची ओळख आणि महत्त्व समजणं गरजेचं आहे. हेच लक्षात घेत पोलापूर तालुक्यातील धारवली ग्रामपंयातीच्या पुढाकाराने संविधानावर व्याख्यान देण्यात आलं होतं. विविध सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं . तसंच व्याख्य़ानाला गावकऱ्य़ांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.






