Cooperation for Prosperity Why International Co-operative Day 2025 Matters
International Co-operative Day 2025 : जगभरात सहकार्याच्या मूल्यांना उजाळा देणारा आंतरराष्ट्रीय सहकार दिन यंदा ५ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यंदाचा दिवस अधिक खास ठरत आहे कारण २०२५ हे संपूर्ण वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९ जून २०२४ रोजी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाने सहकारी चळवळीला जागतिक मान्यता मिळाली असून, “सहकार: चांगल्या जगासाठी समावेशक आणि शाश्वत उपाय” ही यंदाची थीम निश्चित करण्यात आली आहे. सहकार्याचा अर्थ आहे. एकत्र येऊन समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे. ही व्यवस्था लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक हितसंबंधांवर आधारित असून, ती केवळ नफा मिळवण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्याचे मोठे कार्य करते.
भारत हे जगातील सर्वात मोठ्या सहकारी नेटवर्कपैकी एक मानलं जातं. देशात सुमारे 8 लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. या संस्था शेती, दुग्धव्यवसाय, गृहनिर्माण, पतसंस्था, मत्स्यव्यवसाय, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. देशाच्या ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी या संस्था एक बळकट आधार ठरतात. ‘सहकारातून समृद्धीकडे’ हा मंत्र भारताने जगाला दिला आहे. सहकारी संस्था शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ग्रामीण आर्थिक समावेशन, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि सामाजिक न्याय या दिशेने सहकार प्रभावी माध्यम ठरतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणने इस्रायली हेरांच्या शोधात बलुचांवर केली चाल; महिलेचा मृत्यू, 12 जखमी, मानवाधिकार संघटनांचा संताप
भारत सरकारने सहकारी क्षेत्राला अधिक बळ देण्यासाठी ६ जुलै २०२१ रोजी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याचे नेतृत्व असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नव्या सहकारी संस्था उभारल्या गेल्या आहेत. नवीन सहकारी धोरणांची आखणी आणि योजनांची अंमलबजावणी यामुळे ग्रामीण भागात नवचैतन्य आले आहे.
1. ग्राहक सहकारी संस्था – ग्राहकांना वाजवी दरात वस्तू पुरवणाऱ्या संस्था. उदा. केंद्रीय भंडार, अपना बाजार.
2. उत्पादक सहकारी संस्था – लघुउद्योगांना कच्चा माल व साधने पुरवणाऱ्या संस्था. उदा. आप, हरियाणा हातमाग.
विपणन सहकारी संस्था – शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देणाऱ्या संस्था. उदा. अमूल.
पतसंस्था – अल्प व्याजदरात कर्ज देणाऱ्या संस्था. उदा. शहरी सहकारी बँका.
कृषी सहकारी संस्था – संयुक्त शेती व सिंचनासाठी तयार झालेल्या संस्था. उदा. पाणी-पंचायती.
गृहनिर्माण सहकारी संस्था – सामायिक गृहनिर्माण सुविधा पुरवणाऱ्या संस्था.
आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी (ICA) ने १९२३ मध्ये सहकार दिन साजरा करण्याची सुरुवात केली. १९९५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याला अधिकृत मान्यता दिली. यानंतर प्रत्येक वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा दिवस साजरा केला जातो. २०२५ मध्ये हे दिवस आणि वर्ष दोन्ही सहकारासाठी ऐतिहासिक आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? चीनमध्ये सत्ता बदलाची जोरदार चर्चा, ‘हे’ 5 दावेदार सर्वाधिक चर्चेत
आंतरराष्ट्रीय सहकार दिन आणि वर्ष हे संधीचे वर्ष ठरणार आहे – जिथे समावेशक, न्याय्य आणि टिकाऊ आर्थिक व्यवस्थेचा पाया सहकार्याच्या मूल्यांवर उभारला जाईल. भारताची सहकारी चळवळ याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी ‘सहकारातून समृद्धीकडे’ या मार्गावर अधिक जोमाने वाटचाल करण्याचा संकल्प करायला हवा.