भारतीय रेल्वेच्या नियमामध्ये बदल
ट्रेनमध्ये प्रवास तर आपण सर्वजण करतो. परंतु प्रवासाचे काही नियम असतात. जे आपल्या माहिती असायला हवेत. ट्रेनमध्ये बसण्याचे व झोपायचेही काही नियम आहेत. हा नियम तुम्हाला माहीत असेल तर कोणीही तुम्हाला तुमच्या सीटवरुन उठवणार नाही. कोणीही तुमच्याशी भांडणार नाही. तो नियम काय आहे? चला आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ.
काय आहे नियम?
जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला झोपण्याच्या या नियमाबद्दल माहिती हवी. पूर्वी प्रवाशांना ट्रेनमध्ये ९ तास झोपण्याची सुविधा देण्यात आली होती. पण नवीन नियमानुसार वेळेत बदल झाला आहे. आता तुम्ही रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत झोपू शकता. यापूर्वी ही वेळ रात्री 9 ते सकाळी 6 अशी होती. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागायचा. अनेक वेळा तर काही लोकांमध्ये यावरुन वादही व्हायचे.
यावेळी रेल्वेतील प्रवाशांची झोपेची वेळ पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. ज्या रेल्वेमध्ये झोपण्याची सुविधा आहे त्यांना हा नियम लागू होतो. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आरामात प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने नियमात हा बदल केला आहे. हा नियम लागू करण्यापूर्वी मधल्या बर्थचे प्रवासी रात्री लवकर झोपायचे आणि सकाळपर्यंत झोपायचे. यामुळे बसुन प्रवास करणाऱ्यांनी त्रास होत असल्याची तक्रार होती.
आता जेव्हा तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर हा नियम लक्षात ठेवा. जेणेकरून तुमचा प्रवास सोयीस्कर राहील. या नियमानुसार, प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच मधला बर्थ उघडा ठेवू शकतात. तसेच नवीन नियमांनुसार, आरक्षित तिकीट असलेले प्रवासी लोअर बर्थवर प्रवास करतील. ते रात्री 10 वाजण्यापूर्वी किंवा सकाळी 6 नंतर त्यांच्या जागेवर झोपू शकणार नाहीत. कोणत्याही प्रवाशाने या नियमाचे उल्लंघन केल्यास तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली जाऊ शकते.