Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Explainer: एका मोठ्या अणुयुद्धाकडे जगाची वाटचाल..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक घोषणेचा असाही परिणाम?

रशियाने २१ ऑक्टोबर रोजी १४ हजार किलोमीटर अंतरावर आणि १५ तास हवेत राहणाऱ्या अणु-सक्षम ‘बुरेव्हेस्टनिक’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी  घेतली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 03, 2025 | 08:15 PM
Explainer: एका मोठ्या अणुयुद्धाकडे जगाची वाटचाल..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक घोषणेचा असाही परिणाम?
Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर
  • रशियाची ५ तास हवेत राहणाऱ्या अणु-सक्षम ‘बुरेव्हेस्टनिक’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
  • अमेरिकेने १,००० हून अधिक अणुचाचण्या
World War III: ३० ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या अनपेक्षित घोषणेने संपूर्ण जग हादरले आहे. ट्रुथ सोशलवर पोस्ट करताना ट्रम्प यांनी, पेंटागॉनला ३३ वर्षांनंतर अणुशस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. दक्षिण कोरियातील बुसान येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्यापार चर्चेपूर्वी केलेल्या ट्रम्पच्या घोषणेने जागतिक तणाव वाढला आहे. परंतु,   हे पाऊल अणुशस्त्रांच्या प्रसाराला चालना देईल आणि जगाला महायुद्धाच्या उंबरठ्यावर ढकलू शकेल. असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Donald Trump News: ‘आमच्याकडे इतके अणुबॉम्ब की १५० वेळा जग नष्ट होईल’; डोनाल्ड ट्रम्पचा धक्कादायक दावा

डोनाल्ड ट्रम्प यांची अणुचाचणीची घोषणा

रशियाने २१ ऑक्टोबर रोजी १४ हजार किलोमीटर अंतरावर आणि १५ तास हवेत राहणाऱ्या अणु-सक्षम ‘बुरेव्हेस्टनिक’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी  घेतली होती. त्यानंतर  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याबाबत केलेली घोषणा जागतिक स्तरावर खळबळजनक ठरली आहे.

मॉस्कोने या चाचणीला “राष्ट्रीय सुरक्षेचा भाग” म्हटले असून त्यानंतर ‘पोसायडॉन’ अणु ड्रोनची चाचणीही यशस्वीरीत्या पार पडली. हा ड्रोन रशियाच्या ‘सरमॅट’ क्षेपणास्त्रापेक्षा हजारपट अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जाते. ट्रम्प यांच्या घोषणेला रशियाच्या या हालचालींची प्रेरणा असल्याचे मानले जात आहे.

क्रेमलिनने ट्रम्पच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, जर अमेरिकेने प्रत्यक्ष अणुचाचणी केली, तर रशिया “योग्य प्रत्युत्तरात्मक उपाय” करेल. तर इराण आणि चीन यांनी मात्र ट्रम्प यांच्या या घोषणेवर चीनने मौन राखले आहे. तथापि, त्यांच्या अणुसाठ्याच्या विस्तारावरील वृत्तांमुळे तणाव आणखी वाढला आहे.

अमेरिकेच्या अणुचाचण्यांचा इतिहास

१९४५ ते १९९६ दरम्यान अमेरिकेने १,००० हून अधिक अणुचाचण्या केल्या होत्या. १९९२ मध्ये स्वेच्छेने स्थगिती लागू करण्यात आली आणि १९९६ मध्ये ‘व्यापक अणुचाचणी-बंदी करार’ (CTBT) वर स्वाक्षरी झाली, मात्र अमेरिकेने तो मंजूर केला नाही. १९९० नंतर उत्तर कोरिया व्यतिरिक्त कोणत्याही देशाने प्रत्यक्ष स्फोटक चाचणी केलेली नाही.

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानची जमीन हादरली…! 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती

अणुशस्त्रांची नवी शर्यत सुरू होण्याची भीती

ट्रम्पची घोषणा राजकीयदृष्ट्या स्फोटक मानली जात आहे. नेवाडा चाचणी स्थळ पुनर्बांधणीस अनेक वर्षे लागू शकतात, तरीही हा निर्णय अणुशस्त्र स्पर्धा पुन्हा पेटवू शकतो. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या २०२५ च्या अहवालानुसार, दुर्बल होत चाललेल्या शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणालीमुळे नव्या अणुयुगाची चिन्हे दिसत आहेत.

जगातील अणुशस्त्रांचे वितरण

शीतयुद्धानंतर अण्वस्त्रांची संख्या ७० हजारांवरून १२,२४१ इतकी कमी झाली असली तरी अमेरिका आणि रशिया या दोघांकडे एकूण ९०% अण्वस्त्रे आहेत. रशिया: ५,५८०, अमेरिका: ५,०४४, चीन: २०३० पर्यंत १,००० अण्वस्त्रे निर्माण करण्याचे लक्ष्य, संयुक्त राष्ट्रांच्या सप्टेंबर २०२५ च्या अहवालानुसार, युक्रेन युद्ध, तैवान संकट आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक अणुसंतुलनाचा धोका वाढत आहे.

Web Title: Explainer the world is heading towards a major nuclear war is this the result of a declaration by donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Donald Trump

संबंधित बातम्या

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 
1

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 

OPERATION HAWKEYE STRIKE : सीरियात ISIS नेटवर्कला मोठा धक्का; अमेरिकेने लष्करी कारवाई करत दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त
2

OPERATION HAWKEYE STRIKE : सीरियात ISIS नेटवर्कला मोठा धक्का; अमेरिकेने लष्करी कारवाई करत दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त

Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ
3

Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ

Jeffrey Epstein: जगातील सर्वात मोठे स्कँडल! पण ट्रम्पसाठी फाईल्समध्ये दस्तऐवजांची फेरबदल कूटनीती; ‘अनेक’ नावे गुलदस्त्यात
4

Jeffrey Epstein: जगातील सर्वात मोठे स्कँडल! पण ट्रम्पसाठी फाईल्समध्ये दस्तऐवजांची फेरबदल कूटनीती; ‘अनेक’ नावे गुलदस्त्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.