Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Finance News :शांत बसतील ते ट्रम्प कसले; प्रशासनाचा ‘परप फ्युचर्स’ला हिरवा कंदील; आर्थिक बाजारात संघर्षाची चिन्हे

World Finance News : ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत क्रिप्टो आणि कंपन्यांच्या शेअर्सवरील परप फ्युचर्स व्यवहारांना प्रोत्साहन दिले आहे. मात्र, या निर्णयामुळे CME, Cboe आणि Citadel यांसारख्या पारंपरिक वित्तीय संस्थांनी विरोधाची भूमिका घेतली असून कायदेशीर संघर्ष सुरू झाला आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 09, 2026 | 06:28 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • नेमके काय आहेत परप फ्युचर्स ? व्यवहाराला वेळेचे बंधन नाही
  • क्रिप्टोपासून आता कंपन्यांच्या शेअर्सपर्यंत विस्तार
  • वॉल स्ट्रीटचा विरोध ; कायदेशीर लढाईमुळे संघर्ष टोकावर
World Finance News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने क्रिप्टोकरन्सी आणि शेअर बाजाराशी संबंधित परप ( Perpetual Futures ) या नव्या आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे . मात्र सरकारच्या या निर्णयामुळे वॉल स्ट्रीट मधील पारंपरिक आर्थिक संस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे . नव्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममुळे पारंपरिक शेअर बाजार आणि डेरिव्हेटीव्ह व्यवहारांवरील त्यांचे वर्चस्व कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे . या नव्या आर्थिक उत्पादनामुळे बाजारातील जोखीम वाढू शकते .

असा इशाराही वित्तीय क्षेत्रातील दिग्गजांनी दिला आहे . मध्यावधी निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर काही काळासाठी ट्रम्प शांत बसतील अशी चर्चा आणि तसे वातावरण असताना ट्रम्प यांनी सगळ्यांच्या भाकितांवर पाणी फेरले आहे . पण मिळालेल्या माहिती नुसार हा निर्णय अजून अमलात आणला गेला नाही . यासाठी त्याला सिनेट मध्ये काँग्रेसचे समर्थन घ्यावे लागेल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही .

नेमके काय आहेत परप फ्युचर्स ? व्यवहाराला वेळेचे बंधन नाही

परप फ्युचर्स म्हणजे असे आर्थिक करार , ज्यांना पारंपरिक फ्युचर्स व्यवहारांप्रमाणे ठराविक समाप्ती तारीख नसते . त्यामुळे गुंतवणूकदारांना आपली ट्रेडिंग पोझिशन दीर्घकाळ कायम ठेवता येते . क्रिप्टोकरन्सी बाजारात या प्रकारच्या व्यवहारांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे .

अनेक प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात लिव्हीरेजची सुविधाही दिली जाते . त्यामुळे कमी भांडवलात मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये सहभागी होता येते . मात्र बाजारातील किंमत उलट दिशेने गेल्यास नुकसानही अनेक पटींनी वाढू शकते . २०२५ मध्ये जागतिक क्रिप्टो परप व्यवहारांचे प्रमाण तब्बल ६१.७ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचले होते .

Climate Change News : जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि महापूर, हवामान बदलाचा धोका; जागतिक नेते एकत्र येणार

क्रिप्टोपासून आता कंपन्यांच्या शेअर्सपर्यंत विस्तार

अमेरिकेच्या कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशनने या नवीन आर्थिक उत्पादनांना देशांतर्गत नियंत्रित बाजारपेठेत प्रवेश देण्याचा मार्ग खुला केला आहे . यापूर्वी बिटकॉइनसारख्या डिजिटल मालमत्ताशी संबंधित परप फ्युचर्सना परवानगी देण्यात आली होती .

आता ३ नोव्हेंबर २०२६ पासून वैयक्तिक कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित परप फ्युचर्स व्यवहारांनाही मान्यता मिळाली आहे . CFTC चे अध्यक्ष मायकेल सेलिंग यांच्या मते , अशा व्यवहारांना अमेरिकेच्या नियामक चौकटीत आणल्यामुळे गुंतवणूकदारांना अधिक सुरक्षित वातावरण मिळू शकते . मात्र या निर्णयामुळे पारंपरिक शेअर बाजारातील व्यवहारांची रचना बदलण्याची शक्यता आहे .

Diwali In USA: ‘मामदानींनी रांगोळी काढली, अब्दुल सय्यद यांनी दिवा लावला’, अमेरिकन मुस्लिम नेत्यांची मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी

वॉल स्ट्रीटचा विरोध ; कायदेशीर लढाईमुळे संघर्ष टोकावर

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाला पारंपरिक वित्तीय संस्थांकडून विरोध होत आहे . CME ग्रुपने यापूर्वी क्रिप्टो परप फ्युचर्सच्या मंजुरीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती . त्यानंतर Cboe आणि citadel securities यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या पाठिंब्याने Capital Markets Alliance या संघटनेने शेअर्सवरील परप फ्युचर्सच्या मंजुरीला आव्हान दिले आहे .

तर दुसरीकडे नव्या प्लॅटफॉर्मचे म्हणणे आहे की अमेरिकेत नियमबद्ध व्यवहारांना परवानगी दिल्यास गुंतवणूकदारांना परदेशातील अनियंत्रित बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागणार नाही . आता या संघर्षात न्यायालय काय निर्णय देते आणि पारंपरिक वॉल स्ट्रीट कंपन्यांना नव्या स्पर्धेचा किती फटका बसतो , याकडे जागतिक आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे .

Web Title: Trump perp futures wall street cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Financial News
  • Marathi News

संबंधित बातम्या

लंडनच्या झगमगाटात Kartik Aaryanला आली घरच्या दिवाळीची आठवण; पोस्टमधून व्यक्त केल्या भावना
1

लंडनच्या झगमगाटात Kartik Aaryanला आली घरच्या दिवाळीची आठवण; पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

Patri Sarkar 1942 Trailer Launched: तो संवाद ऐकलात? अंगावर शहारे आणणारा ‘पत्री सरकार’चा ट्रेलर व्हायरल चर्चेत
2

Patri Sarkar 1942 Trailer Launched: तो संवाद ऐकलात? अंगावर शहारे आणणारा ‘पत्री सरकार’चा ट्रेलर व्हायरल चर्चेत

Climate Change News : जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि महापूर, हवामान बदलाचा धोका; जागतिक नेते एकत्र येणार
3

Climate Change News : जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि महापूर, हवामान बदलाचा धोका; जागतिक नेते एकत्र येणार

Kranti Redkar’s twin daughters Look: क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींची दिवाळी स्पेशल झलक; गोड फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं
4

Kranti Redkar’s twin daughters Look: क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींची दिवाळी स्पेशल झलक; गोड फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.