Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोवा मुक्ती दिन : 450 वर्षांच्या गुलामगिरीवर स्वातंत्र्याचा विजय, पोर्तुगीज सत्ता संपली अन् गोव्यात उगवला स्वतंत्र सूर्य

गोवा मुक्ती दिन, 19 डिसेंबर, हा गोव्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. 1961 मध्ये याच दिवशी भारतीय सशस्त्र दलांनी पोर्तुगीज सत्तेपासून गोवा मुक्त केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 19, 2024 | 09:25 AM
Goa Liberation Day Victory of freedom over 450 years of slavery Portuguese rule ended and the sun of independence rose in Goa

Goa Liberation Day Victory of freedom over 450 years of slavery Portuguese rule ended and the sun of independence rose in Goa

Follow Us
Close
Follow Us:

पणजी : गोवा मुक्ती दिन, 19 डिसेंबर, हा गोव्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. 1961 मध्ये याच दिवशी भारतीय सशस्त्र दलांनी पोर्तुगीज सत्तेपासून गोवा मुक्त केले. सुमारे 450 वर्षे पोर्तुगीज राजवटीखाली राहिलेल्या गोव्याच्या स्वातंत्र्याचा हा दिवस प्रत्येक गोमंतकीयाच्या हृदयातील विशेष स्थान राखून आहे.

गोवा मुक्तीची ऐतिहासिक पार्श्वभूमी

गोवा हे भारताच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरील एक सुंदर राज्य असून, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोव्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारताने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवल्यानंतरही पोर्तुगीजांनी गोव्याला आपल्याकडे ठेवण्यासाठी कडवा विरोध केला.

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पोर्तुगीजांशी अनेक मुत्सद्दी चर्चा केल्या, पण त्या निष्फळ ठरल्यामुळे लष्करी हस्तक्षेप हा एकमेव पर्याय ठरला. 18 डिसेंबर 1961 रोजी सुरू झालेल्या ऑपरेशन विजयच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांनी फक्त ३६ तासांत गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त केले. या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे कामगिरी केली.

19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पुन्हा भारताचा भाग बनला आणि पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला. यानंतर गोवा केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला गेला आणि 1987 मध्ये त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला.

नवराष्ट्र विशेष बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ला निना समुद्रात थंडी का आणते? जाणून घ्या मार्चपूर्वी याचा भारताच्या हवामानावर काय परिणाम होणार

गोवा मुक्ती दिनाचे महत्त्व

गोवा मुक्ती दिन हा फक्त ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी नव्हे, तर गोव्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. गोवा हे आज भारतातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य आहे.

गोवा मुक्ती दिनाचे उत्सव

गोव्यात हा दिवस भव्य उत्सवांनी साजरा केला जातो. राज्यातील वेगवेगळ्या भागांतून मशाल मिरवणुका निघतात आणि त्या आझाद मैदानावर एकत्र येतात. या ठिकाणी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढताना प्राण गमावलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, सुगम संगीत मैफली आणि विविध प्रकारच्या कला सादरीकरणांनी हा दिवस साजरा होतो.

जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सौदी अरेबियात तेलाच्या विहिरीत सापडले पांढरे सोने; मक्का-मदिना देश होणार करोडपती

गोव्याची वैशिष्ट्ये

गोव्याच्या निसर्गसंपत्तीपासून सांस्कृतिक वारशापर्यंत अनेक गोष्टी त्याला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात.

जैवविविधता : गोव्याच्या सुमारे 20% भूभागावर पश्चिम घाट पसरलेला आहे. हा जैवविविधतेचा खजिना म्हणून ओळखला जातो.

सुंदर धबधबे : गोव्यातील दूधसागर धबधबा, 1017 फूट उंचीचा, पर्यटकांना आकर्षित करतो.

दुचाकी टॅक्सी : भारतातील एकमेव राज्य, जिथे दुचाकी टॅक्सी (पायलट) सेवा उपलब्ध आहे.

पक्षीवैविध्य : येथे 400 हून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात.

प्राचीन खडक : गोव्यातील काही खडक 3600 दशलक्ष वर्षांहून जुने आहेत.

गोवा मुक्ती दिनाचे महत्त्व

गोवा हे निसर्गरम्य किनारे, समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारशामुळे भारताचा एक अनमोल हिरा आहे. गोवा मुक्ती दिन हा केवळ स्वातंत्र्याचा उत्सव नाही, तर आपल्या वारशाचा आणि स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदानाचा सन्मान आहे. गोवा आज पर्यटन, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारशात आघाडीवर आहे. गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने या सर्व गोष्टींची आठवण होते आणि गोव्याच्या प्रगतीचा गौरव साजरा होतो.

Web Title: Goa liberation victory of freedom over 450 years of slavery portuguese rule ended nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 09:25 AM

Topics:  

  • day history

संबंधित बातम्या

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?
1

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?

World Kindness Day 2025 : दयाळूपणा म्हणजे शब्दांपलीकडच्या संवादाचं सौंदर्य
2

World Kindness Day 2025 : दयाळूपणा म्हणजे शब्दांपलीकडच्या संवादाचं सौंदर्य

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू
3

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.