Hidden moons may orbit Earth Research reveals the secret of mysterious minimoons
Earth’s minimoon : ब्रह्मांड हे अगम्य, विशाल आणि अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आपल्याला चंद्र म्हटले की आठवतो तो आपला एकमेव नैसर्गिक उपग्रह, जो पृथ्वीभोवती स्थिरपणे फिरत असतो. पण, शास्त्रज्ञांच्या अलीकडच्या संशोधनानुसार असे समोर आले आहे की पृथ्वीच्या कक्षेत एक नाही तर किमान सहा ‘मिनीमून’ म्हणजेच लघु-चंद्र असू शकतात!
हे मिनीमून म्हणजे काय? हे खरे चंद्र नाहीत, तर अतिशय लहान आकाराचे तुकडे किंवा खगोलीय वस्तू आहेत, जे काही काळासाठी पृथ्वीभोवती फिरतात आणि नंतर सूर्याभोवती फिरण्यास सुरुवात करतात. हे इतके छोटे असतात की त्यांचा व्यास फक्त १ ते २ मीटर असतो. त्यामुळे त्यांना ओळखणे, ट्रॅक करणे फारच कठीण असते. पण हे लपलेले चंद्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात काही काळ अडकतात आणि नंतर दूर जातात.
या विषयावर हवाई विद्यापीठातील प्रमुख संशोधक रॉबर्ट जेडिक यांनी एक अतिशय रोचक उदाहरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, “हे एकप्रकारचे चौरस नृत्य आहे, जिथे नर्तक दरवेळी बदलतात आणि कधी कधी काही काळासाठी नृत्यमंच सोडून देतात.” म्हणजेच हे मिनीमून सतत ये-जा करत असतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पूर्वी शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की हे मिनीमून मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान असलेल्या लघुग्रह पट्ट्यातून पृथ्वीच्या कक्षेत येतात. पण आता, अलीकडील संशोधनानुसार असे दिसून येत आहे की यातील अनेक तुकडे चंद्रावरूनच आलेले असू शकतात.
उदाहरणार्थ, २०१६ मध्ये हवाईमधील Pan-STARRS1 दुर्बिणीने ‘कामो’ओलेवा’ नावाचा एक मिनीमून शोधला, जो सुमारे ४० ते १०० मीटर व्यासाचा होता. नंतरच्या अभ्यासातून असे निष्पन्न झाले की हा चंद्रावर झालेल्या एका प्रचंड उल्कापातामध्ये (Giordano Bruno crater) चंद्रावरून फुटलेला तुकडा होता. तसेच, २०२४ मध्ये सापडलेला ‘२०२४ पीटी५’ नावाचा मिनीमून देखील चंद्रावरूनच आलेला असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे आता हा विश्वास दृढ होतो आहे की, चंद्र स्वतःचेच तुकडे वेळोवेळी पृथ्वीच्या लघु-चंद्रांमध्ये रूपांतरित करत असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SCO Summit Tianjin Proposal : इराणची ‘नवीन NATO’ रणनीती! चीन-रशियाच्या पाठिंब्याने इस्रायल-अमेरिकेला देणार टक्कर
एक मिनीमून सरासरी ९ महिने पृथ्वीभोवती फिरतो, त्यानंतर तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडतो आणि सूर्याभोवती फिरायला लागतो. या मिनीमूनची संख्या नक्की किती आहे, हे सांगणे फार कठीण आहे, कारण ते चंद्रावर झालेल्या टक्करांच्या प्रकारावर, त्या टक्करांमधून उडालेल्या तुकड्यांच्या वेगावर आणि दिशेवर अवलंबून असते. जरी हे संशोधन अजूनही अनिश्चिततेने भरलेले असले तरी, शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की जर असे बरेच मिनीमून अस्तित्वात असतील, तर भविष्यात त्यांच्या शोधांमधून अनेक रहस्ये उलगडू शकतात.