फोटो सौजन्य - Social Media
हरियाणा राज्यातील क्षत्रिय समाज म्हणून राज्यभरात सगळ्याच क्षेत्रात डंका असणारा समाज म्हणजे ‘रोड मराठा’. हा समाज सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली आहे. वर्णाने क्षत्रिय असणारा हा समाज शेती करण्यात अग्रेसर आहे, तसेच लष्करामध्येही मोठ्या प्रमाणात भरती होतो. हरियाणा राज्यातील अनेक मोठे नेतेमंडळी या समाजातून आहेत. महत्वाचे म्हणजे या समाजाचा महाराष्ट्राशी जुनी नाळ आहे. कारण या समाजाचे चालीरीतीमध्ये महाराष्ट्राचा प्रभाव दिसून येतो. तो प्रभाव का आहे? चला तर मग जाणून घेऊयात.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धाअगोदर हरियाणा राज्यात रोड मराठा नावाची कोणतीही जात तिथे अस्तित्वात नव्हती. अब्दालीने हिंद प्रांतावर आक्रमण करताच मायभूच्या रक्षणासाठी मराठे दखन्न भागातून उत्तरेकडे अब्दालीला अडवण्यास निघाले. इतिहास सांगते की या युद्धात मराठ्यांची हार झाली. तरीही अब्दालीने हिंद प्रांत ताब्यात घेतला नाही. असे म्हणतात की या युद्धानंतर यमुनेचे पाणी आठवड्याभरासाठी लाल रंगाचे वाहत होते. पानिपतच्या मातीत आजही मराठ्यांच्या पावन रक्ताचे अवशेष सापडतात. ही झाली मराठ्यांची शौर्यगाथा! परंतु, जेव्हा मराठ्यांना या युद्धात हार मिळाली, तेव्हा त्यातील काही मराठा सैन्य पानिपत, सोनिपत तसेच कर्नाल आणि शेजारील क्षेत्रात स्थायिक झाले. कालांतराने त्यांच्या भाषेत बदल झाला आणि त्यांनी तेथील स्थानिक परंपरा जोपासण्यास सुरुवात केली.
या लोकांना रोड मराठा या नावाने ओळखले जाऊ लागले. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला अनेक वर्षे उलटून गेली परंतु या वीरांनी त्यांची ओळख तशीच शाबूत ठेवली आहे. त्यांच्या आडनावांमध्ये, त्यांच्या भाषांमध्ये तसेच त्यांच्या परंपरेमध्ये अजूनही मराठ्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते.
आजही तेथील रोड लोकं, स्वतःला अभिमानाने मराठा म्हणून संबोधतात. आजही रौड मराठे हरियाणाच्या राजकारणात आणि लष्करात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक कार्यातही आघाडीवर आहेत. रोड मराठा समाजातील अनेक कुटुंब दर राज्याभिषेक दिनी आवर्जून श्री दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर येत असतात. दोन्हीही राज्यातील मराठ्यांमध्ये एकमेकांविषयी आपुलकीची भावना दिसून येते.