Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वातावरणाच्या वरच्या थरात Ozoneची ७० टक्क्यांनी वाढ! हवामान बदलाचे संकट गडद!

पावसाळ्याच्या म्हणजेच आशियाई ग्रीष्मकालीन मान्सूनच्या काळात वातावरणाच्या वरच्या थरातील ओझोन वायूचे प्रमाण गेल्या १५० वर्षांत तब्बल ७० टक्क्यांनी वाढल्याचे संशोधनातून समोर आले आहे

  • By प्रीति माने
Updated On: Apr 19, 2026 | 03:09 PM
IITM research reveals a 70% increase in ozone in the upper layers of the atmosphere

IITM research reveals a 70% increase in ozone in the upper layers of the atmosphere

Follow Us
Close
Follow Us:

सुनयना सोनवणे : पुणे : हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटात आता आणखी एका गंभीर धोक्याची भर पडली आहे. पावसाळ्याच्या म्हणजेच आशियाई ग्रीष्मकालीन मान्सूनच्या काळात वातावरणाच्या वरच्या थरातील ओझोन वायूचे प्रमाण गेल्या १५० वर्षांत तब्बल ७० टक्क्यांनी वाढल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हा अतिरिक्त ओझोन हरितगृह वायूप्रमाणे काम करत असून सूर्याची उष्णता वरच्या वातावरणात अडकवून ठेवत आहे. त्यामुळे भारतीय उपखंडातील तापमानवाढ अधिक तीव्र होत असल्याचा निष्कर्ष पुण्यातील ‘भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थे’च्या (आयआयटीएम) नव्या संशोधनातून पुढे आला आहे.

आयआयटीएमचे संशोधक चैत्री रॉय, अनुप एस. महाजन, डी. सी. अवंतिका, सचिन घुडे आणि गौरव गोवर्धन यांनी हे महत्त्वाचे संशोधन केले आहे. नुकतेच हे संशोधन ‘जेजीआर ॲटमॉस्फिअर’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. जमिनीलगत असलेला ओझोन हा आरोग्यासाठी घातक प्रदूषक असतो, तर वरच्या थरातील ओझोन सूर्याची किरणे नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे काम करतो. मात्र, वाढता मानवी हस्तक्षेप आणि जीवाश्म इंधनांच्या अफाट वापरामुळे या नैसर्गिक समतोलाला धक्का बसला आहे.

हे देखील वाचा : Heat strokeपासून संरक्षण आवश्यक! उन्हामध्ये आरोग्याची कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांचे मत काय?

ओझोन हा वायू जमिनीच्या जवळ असताना प्रदूषक मानला जातो आणि श्वसनविकारांसाठी घातक ठरतो. मात्र वातावरणाच्या वरच्या थरात तो उष्णता अडवून ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे तो हरितगृह वायूप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेषतः १० ते १५ किलोमीटर उंचीवरील वातावरणात त्याचा परिणाम अधिक गंभीर ठरतो.

संशोधनानुसार, मान्सूनच्या काळात वाहनांचा धूर, उद्योग, कोळसा आणि पेट्रोलियम इंधन जाळल्यामुळे तयार होणारे नायट्रोजन ऑक्साईड्स आणि कार्बन मोनॉक्साईड यांसारखे प्रदूषक ढगांच्या तीव्र उर्ध्वगामी हालचालीमुळे वरच्या वातावरणात पोहोचतात. या प्रक्रियेला ‘कन्वेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट’ किंवा अभिसरण वहन असे म्हटले जाते. हीच प्रदूषके वरच्या वातावरणात ओझोनची निर्मिती वाढवतात आणि त्यामुळे उष्णता अधिक प्रमाणात अडकून राहते.

हे देखील वाचा : Smart Meterवरुन उत्तर प्रदेशमध्ये वादंग! CM योगी आदित्यनाथ यांचे चौकशीचे आदेश

तातडीच्या उपाययोजनांची गरज –
संशोधकांच्या मते, आता केवळ कार्बन डायऑक्साइड कमी करण्यावर भर देऊन चालणार नाही. नायट्रोजन ऑक्साईड्स आणि कार्बन मोनॉक्साईडसारख्या प्रदूषकांचे उत्सर्जनही तातडीने कमी करणे आवश्यक आहे. यासाठी कठोर पर्यावरणीय धोरणे राबवली नाहीत, तर भविष्यात तापमानवाढ, मान्सूनचा बदलता स्वभाव आणि हवामान संकट अधिक तीव्र होऊ शकते.

संशोधनातील निष्कर्ष –

  • वरच्या वातावरणातील ओझोन वाढण्यामागे नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईड हे मुख्य कारण आहेत.
  • मान्सूनच्या काळात ही प्रदूषके वरच्या वातावरणात पोहोचून ओझोनची निर्मिती वाढवतात.
  • वाढलेला ओझोन उष्णता अडकवून ठेवतो, त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका गंभीर होतो.

Web Title: Iitm research reveals a 70 increase in ozone in the upper layers of the atmosphere

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.