या देशाला वीर योद्धांची परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून ते आजतागायत देशसेवेसाठी आणि गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी शूर वीरांनी वीरमरण पत्कारलं आहे. याच शूरवीरांप्रमाणेच देश ब्रिटीशांपासून स्वतंत्र होण्यासाठी रणरागिणी देखील लढल्या होत्या. जेव्हा बांगड्या भरणारे हात देशसेवेसाठी शस्त्र उचलतात, जेव्हा चूल आणि मूल सांभाळणारी आणि डोक्यावर पदर घेणारी सात्विक स्त्री लाजारी आणि अमानुष होणाऱ्या अन्यायाविरोधात फक्त उभी राहत नाही तर अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश सरकारला सळो कि पळो करते त्या रणरागिणींचा देखील स्वातंत्र्य संग्रामात मोलाचा वाटा आहे.
भारताच्या आता स्वातंत्र्य मिळवून 79 वर्ष झाली आहे. या स्वातंत्र्याच्या लढ्यात प्राण पणाला लावणाऱ्या रणरागिणींच्या शौर्याचा इतिहास जाणून घेऊयात.
राणी लक्ष्मीबाई
मेरी झाँसी कभी नहीं दूंगी म्हणत जिने ब्रिटीश सरकारच्या नाकी नऊ आणल्य़ा ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई. 1887 साली झालेल्या पहिल्या वहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची प्रमुख योद्धा ही राणी लक्ष्मीबाई होती. इंग्रजांनी विविध मार्गाने लक्ष्मीबाईची झाँसी कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र राणी लक्ष्मीबाईच्या परातक्रमामुळे इंग्रजांना झाँसी मिळवणं कठीण होत गेलं. आपल्या मुलाला पाठीला बांधून इंग्रजांशी दोन हात करणारी ही राणी ग्वालेयरच्या युद्धात धारातिर्थी पडली.
बेगम हजरत महल
1857 च्या उठावात या अवधच्या राणीने इंग्रजांविरुद्धच्या क्रांतीकारी चळवळीत सक्रिय होती. या स्वातंत्र्य संग्रामातील या राणीचं मोलाचं योगदान होतं. बेगम हजरतचा मुलगा बिरजीस कादर गादीवर बसवल्यानंतर, त्याने लखनौमधून इंग्रजांना हाकलून लावले.
भीकाजी कामा
पॅरिसमध्ये राहत असताना, भिकाजी कामा यांनी १९०७ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भारतीय स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा फडकवला.त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला आणि क्रांतिकारकांना गुप्तपणे मदत केली.
अरुणा आसफ अली.
1942 च्या ‘छोडो भारत’ चळवळ आंदोलनात अरुणा आसफ अली ही दिल्लीची राणी देखील सहभागी होती. ‘छोडो भारत’ चळवळीत या राणीने इंग्रजांना युद्धाचं आव्हानं दिलं होतं. या राणीने मुंबईत तिरंगा फडकावत आंदोलन छेडलं होतं. या दिल्लीच्य़ा राणीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
सरोजिनी नायडू
शस्त्राबरोबर शब्द सुद्धा तितकेच धारदार असतात. सरोजिनी नायडू या कवयित्री असण्य़ाबरोबरच स्वातंत्र्य संग्रमाच्या चळवळीत देखील त्या सामील होत्या. सरोजिनी नायडू या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्य़ानंतर सत्याग्रह, महिलांचे अधिकार आणि स्वातंत्र्य यासाठी त्य़ांनी अनेक संघर्ष केला होता.