
International Anti-Corruption Day
दरवर्षी जगभरात ९ डिसेंबर रोजी भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो. हा दिवस भ्रष्टाचाराविरोधात एकजूट होऊन त्याला लढा देण्याचा संदेश देतो. २००३ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी भ्रष्टाचार आंतरराष्ट्रीय करार (UN Convention Against Corruption) ची सुरुवात केली होती. आज या निमित्त आपण याचे महत्त्व, हा दिवस का साजरा केला जातो आणि यंदाची थीम काय आहे हे जाणून घेणार आहोत.
एखाद्या व्यक्तीच्या भ्रष्टाचारामुळे केवळ त्या व्यक्तीचा स्वार्थच साधला जात नाही, तर यामुळे इतरांचे हक्क हिरावले जातात. यामुळे आपल्या राष्ट्राचा विकासाला गळफास बसतो. यामुळे समाजाची आर्थिक आणि सामाजिक रचना कमकुवत होते. शिक्षण, व्यवस्था, आरोग्य यांसारख्या पायाभूत सुविधांवर भ्रष्टाचाराची सावली पडली तर सामान्य लोकांचे हाल होता, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. देशातील विकास प्रक्रियेवर याचा मोठा परिणाम होतो. यामुळेच याला विरोध करण्यासाठी आणि त्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर लोक एकत्र येतात. यामुळे समाजातील गरिबी कमी होण्यासही मदत होते. जगभरात समानता राहते.
यामुळे आजच्या दिवसाचे महत्व हे नागरिकांना आणि शासनाला भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांची जाणीव करुन देणे, न्याय आणि शासन व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणे, जनतेला भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचे महत्त्व पटवून देणे. तसेच सरकार, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांमध्ये सुसंवाद वाढवणे आहे.
एखाद्या व्यक्तीच्या, संस्थेच्या किंवा शासनाच्या भ्रष्टाचारामुळे विकासाची गती मंदावते, यामुळे समाजात विषमता निर्माण होते आणि कायद्यावरचा विश्वासही कमी होती. यामुळे आजचा दिवस हा जागतिक स्तरावर लोकांना भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यास प्रेरित करणे, तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्याच्या दुष्परिणामांची जाणीव करुन देणे याचा उद्देश आहे. यामुळेच संयुक्त राष्ट्र संघाने या दिनाची सुरुवात केली होती. जर प्रत्येक नागरिक जागरुक झाला तर खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराला आळा बसेल. ईमानदारी, जबाबदारी राखली जाईल. यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, न्यायपूर्ण आणि प्रगतिशील राष्ट्राची उत्पती होईल.
दरवर्षी या दिनानिमित्त एक उद्देश ठरवण्यात येतो. यंदा युवकांना भ्रष्टाचाराविरोधात जागरुक करणे, त्याच्या दुष्परिणामांची जाणीव करुन देणे आणि त्याविरोधात एकजूट होऊन आवाज उठवण्यास प्रेरित करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. कारण सध्या युवा हा भविष्याची पायाभूत रचना आहे. त्याच्या विचारांवर, प्रश्न विचारण्याच्या धाडसावर आणि भ्रष्टाचाराविरोधातील दुराग्रह पुढील पिढीसाठी स्वच्छ आणि न्यायपूर्ण समाज उभारु शकेल.