International Day for Biological Diversity A day to pledge to protect nature
International Biological Diversity Day : दरवर्षी २२ मे रोजी संपूर्ण जगभर ‘आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन’ साजरा केला जातो. हा दिवस निसर्गाच्या असामान्य वैविध्याचे महत्त्व अधोरेखित करतो आणि आपण त्याच्या संरक्षणासाठी घेत असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतो. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने १९९३ पासून या दिवसाचे आयोजन सुरू झाले असून, त्यामागचा उद्देश म्हणजे जैवविविधतेबद्दल जनजागृती आणि तिच्या रक्षणासाठी कृती घडवून आणणे.
आपण श्वास घेतो ती हवा, जे अन्न आपण खातो, आपण वापरत असलेले इंधन, औषधोपचारासाठी लागणारी वनस्पती… हे सर्व निसर्गाचेच दान आहे. निसर्गाशिवाय मानवी अस्तित्व अशक्य आहे. तरीही आज आपण आपल्या कृतींमुळे पृथ्वीवरील जैवविविधतेला गंभीर धोक्यात आणले आहे. अधिवास नष्ट होणे, प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड आणि अत्याधिक शहरीकरण यामुळे सुमारे दहा लाख प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
संयुक्त राष्ट्रांनी यावर्षी २०२५ मध्ये जैविक विविधतेसाठी ठरवलेली थीम आहे – “करारापासून कृतीकडे: जैवविविधतेचे निर्माण” (From Agreement to Action: Building Back Biodiversity). ही थीम चीनच्या कुनमिंग येथे पार पडलेल्या जैवविविधता अधिवेशन COP-15 च्या निष्कर्षांवर आधारित आहे. या थीमच्या माध्यमातून नुसतेच करार करणे पुरेसे नसून प्रत्यक्ष कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. जैवविविधतेचा अर्थ केवळ प्राण्यांपुरता मर्यादित नसून, त्यात वनस्पती, सूक्ष्मजीव, बुरशी, सागरी जीवन आणि परिसंस्थांचा समावेश होतो. या जैवविविधतेमुळे आपल्याला अन्न, पाणी, औषधे, ऊर्जा, हवामानाचे संतुलन आणि नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळते. ती हरवली, तर मानवजात देखील संकटात येईल, हे विसरून चालणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशात राजकीय संघर्ष टोकाला; कोणत्याही परिस्थिती शेख हसिनांना सोडण्यास तयार नाही सरकार, अडचणीत वाढ
गेल्या पन्नास वर्षांत सुमारे ६० टक्के वन्य सस्तन प्राणी नामशेष झाले आहेत. ही आकडेवारी मानवाच्या निसर्गविनाशक वर्तनाचे गंभीर परिणाम दर्शवते. जर आपण आता उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात पिढ्यानपिढ्या निसर्गाच्या संपत्तीपासून वंचित राहतील. जैवविविधतेचा आंतरराष्ट्रीय दिवस हा फक्त एक साजरा करण्याचा दिवस नसून, निसर्गासाठी काही करण्याचा निर्धार करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी शाळा, महाविद्यालये, पर्यावरण संस्था, स्थानिक संस्था आणि शासन विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करत असतात. पर्यावरण संरक्षणात नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Government: ‘आता दारूपासून सिगारेटपर्यंत…’ पाकिस्तानचे खिसे भरताना चीनवर गरिबीचे सावट
निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहे. मानवाच्या सुखद भविष्याचा पाया हा जैवविविधतेवर आधारित आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण शपथ घेऊया – निसर्गावर प्रेम करू, त्याचे रक्षण करू आणि भावी पिढ्यांसाठी एक समतोल, समृद्ध आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करू.