
International Music Day 2024: जाणून घ्या संगीताचे जागतिक महत्त्व आणि त्याचा इतिहास
दरवर्षी 1 ऑक्टोंबर रोजी आंतरराष्ट्रीय संगीत दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामगचा उद्देश म्हणजे संगीताचा प्रसार करणे आहे. गेल्या काही वर्षापासून संगीताचे महत्त्व पक्त सीमा किंवा धर्मांमध्ये अडकलेले नाही तर संगीत संपूर्ण मानव जातीला जोडण्याचे एक साधन बनलेले आहे. अलीकडे आंतरराष्ट्रीय संगीताने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. संगीतमध्ये लोकांना जोडून ठेवण्याचे सामर्थ्य आहे.
संगीताचे महत्त्व केवळ मनोरंजनापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. तर संगीतमध्ये एक उपचारात्मक शक्ती देखील आहे. विविध प्रकारचे संगीत आपल्याला मानसिक, भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या बळकट करते. याचबरोबर संगीत हे सांस्कृतिक परंपरांचे आणि ऐतिहासिक वारशाचे एक महत्त्वाचा भाग आहे. विविध देश, प्रदेश आणि धर्मांच्या लोकगीतांपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत, प्रत्येक शैलीत एक वेगळेपण आणि अस्मिता आहे. या दिवशी जगभरातील संगीतप्रेमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. वेगवेगळ्या संगीतांचे कॉन्सर्ट या दिवशी असतात. यामध्ये युवा संगीतप्रमांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. लोक संगीतातून संवाद साधण्याचा एक अनोखा प्रयत्न करतात.
आंतरारष्ट्रीय संगीत दिनाचा इतिहास
1949 मध्ये, युनेस्कोच्या टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीताचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतनंतर त्यांच्या लक्षात आले की, संगीत सर्वांना जोडून ठेवण्याचे काम करते त्यामुळे त्यांनी 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय संगीत दिन साजरा करण्याचे लोकांना महत्त्व पटवून दिले. त्या दिवशीपासून या दिवसाची सुरुवात करण्यात आली. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संगीताचा उपयोग केला जाऊ शकतो. लॉर्ड येहुदी मेनुहिन यांना विश्वास होता की संगीत देशांमधील संबंध मजबूत करेल. यामुळे समुदायांमधील सांस्कृतिक फरक देखील कमी होईल.
भारतातही आंतरराष्ट्रीय संगीत दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिदुस्तानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीतासोबतच लोकसंगीत, सूफी संगीत आमि आधुनिक संगीत या प्रकारांमध्ये बारतीय संघीताचे वैविध्य आतंरराष्ट्रीय स्तरावर पटवून दिले जाते. संगीत हा जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे.
संगीत ऐकण्याचे फायदे
संगीत ऐकण्याचे अनेक सकारात्मक परिणाम आहेत. संगीत केवळ मूड सुधारण्यास मदत करतच नाही तर यामुळे तणावग्रस्त लोकांना खूप मदत होते. संगीतामध्ये केवळ भावना व्यक्त करण्याची ताकद नाही तर सांस्कृतिक बंध अधिक घट्ट करण्याची क्षमता आहे. संगीत ऐकल्याने शरीराला एक ऊर्जा मिळते, ज्यामुळे आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम होतो.
संगीत ऐकणे भावनात्मक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संशोधनानुसार, जे लोक नियमितपणे संगीत ऐकतात, त्यांच्यात तणाव कमी असतो आणि ते अधिक आनंदी असतात. संगीतामुळे एकात्मता आणि समाजातील आपले स्थान महत्त्वाचे वाटते. त्याचबरोबर, संगीत ऐकताना हृदयाची गती आणि श्वासोच्छवास बदलतो, ज्याचा आपल्या शारीरिक क्षमता वाढवण्यावर चांगला परिणाम होतो. काही अभ्यासांनुसार, संगीत ऐकणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते.