Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Liberation: जेव्हा 4,000 महिलांनी लंडन हादरवलं; 1971 चा ‘तो’ क्रांतिकारी मोर्चा, ज्याने बदललं स्त्रियांचं नशीब

Women's Liberation March 1971 : नवजात महिला मुक्ती चळवळीचे पहिले प्रदर्शन सुमारे ५० वर्षांपूर्वी या आठवड्यात झाले. समान वेतन आणि हक्कांसाठी लढणाऱ्या काही महिलांना अजूनही तो दिवस आठवतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 03, 2026 | 09:22 AM
International Women's Day Special March 6 1971 the day when women took to the streets

International Women's Day Special March 6 1971 the day when women took to the streets

Follow Us
Close
Follow Us:
  • ६ मार्च १९७१ रोजी लंडनच्या रस्त्यावर ४,००० हून अधिक महिलांनी पहिल्यांदाच ‘समान हक्कांसाठी’ ऐतिहासिक मोर्चा काढला, ज्याने जागतिक स्त्रीमुक्ती चळवळीला नवी दिशा दिली.
  • समान वेतन, शिक्षणाच्या समान संधी, मोफत गर्भनिरोधक आणि २४ तास सरकारी पाळणाघरे (Nurseries) या चार मुख्य मागण्यांसाठी महिलांनी बर्फाळ वातावरणातही लढा दिला.
  •  या एका मोर्चाने स्त्रियांच्या घरगुती जाचाला आणि लैंगिक भेदभावाला राजकीय रूप दिले, ज्याचा परिणाम म्हणून पुढे स्त्रीवादी चळवळ जगभर पसरली.

Women’s Liberation Movement London 1971 march : स्त्रीमुक्तीच्या गप्पा आज आपण सर्वजण करतो, पण या चळवळीने रस्त्यावर उतरून व्यवस्थेला कधी हादरवले? तो दिवस होता ६ मार्च १९७१. लंडनमध्ये कडाक्याची थंडी, कोसळणारा बर्फ आणि गारांचा मारा सुरू असताना हजारो महिलांनी आपल्या हक्कांसाठी हायड पार्क ते ट्रॅफलगर स्क्वेअरपर्यंत पायपीट केली. आज या ऐतिहासिक घटनेला अर्धशतकाहून अधिक काळ लोटला असला, तरी त्या दिवशी रस्त्यावर उतरलेल्या ‘त्या’ वीरांगनांच्या डोळ्यांतील ठिणगी आजही प्रेरणादायी आहे.

बर्फाळ वातावरणात पेटली क्रांतीची मशाल

“खूप थंडी होती, पण वातावरणात एक वेगळाच आनंद आणि उत्साह होता,” अशा शब्दांत इतिहासकार शीला रोबोथम त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देतात. १९७१ च्या त्या शनिवारी सुमारे ४,००० महिला, मुले आणि काही संवेदनशील पुरुषांनी हायड पार्क येथे एकत्र जमून मोर्चाची सुरुवात केली. त्यांच्या हातात बॅनर होते, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते “Women Unite” (स्त्रियांनो, एकत्रित व्हा!).

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

काय होत्या त्या ४ प्रमुख मागण्या?

या मोर्चाने स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रश्नांना वाचा फोडली. स्त्रियांनी सरकारसमोर चार मुख्य मागण्या ठेवल्या होत्या: १. समान वेतन (Equal Pay): पुरुषांच्या बरोबरीने काम करूनही कमी पगार मिळण्याविरुद्ध एल्गार. २. शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी: केवळ घर सांभाळणे हे स्त्रीचे कर्तव्य नाही, हे ठणकावून सांगितले. ३. मोफत गर्भनिरोधक आणि गर्भपाताचा अधिकार: स्वतःच्या शरीरावर स्वतःचे नियंत्रण असावे, ही मागणी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या करण्यात आली. ४. २४ तास पाळणाघरे: नोकरी करणाऱ्या मातांसाठी मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सरकारने घ्यावी.

संगीत आणि स्ट्रीट थिएटरने वेधले लक्ष

हा मोर्चा केवळ घोषणाबाजीपुरता मर्यादित नव्हता. आंदोलकांनी स्ट्रीट थिएटर आणि गाण्यांचा वापर करून लोकांचे लक्ष वेधले. एका प्राममध्ये (मुलांच्या गाडीत) ग्रामोफोन ठेवून त्यावर त्या काळातील लैंगिकतावादी गाणी वाजवून त्यांचा निषेध केला जात होता. स्त्रियांकडे केवळ ‘सुंदर दिसण्याचे साधन’ म्हणून पाहणाऱ्या मानसिकतेला या मोर्चाने आरसा दाखवला. रिजेन्ट स्ट्रीटवर खरेदी करणाऱ्या अनेक मध्यमवर्गीय महिलाही त्या दिवशी आपली पिशवी बाजूला ठेवून या मोर्चात सामील झाल्या होत्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

मैत्री आणि संघर्षाचा वारसा

इतिहासकार सॅली अलेक्झांडर सांगतात की, त्याकाळी मातृत्वामुळे नोकरीच्या बाजारात महिलांना मोठा भेदभाव सहन करावा लागत असे. “आम्ही फक्त निषेध करत नव्हतो, तर आम्ही जग बदलत होतो,” असे त्या म्हणतात. आजही त्या मोर्चातील अनेक निदर्शक एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. त्यांनी सुरू केलेल्या त्या लढ्यामुळेच आज आपण कामाच्या ठिकाणी समान अधिकारांबद्दल बोलू शकत आहोत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिला मुक्ती चळवळीचा पहिला मोठा मोर्चा कधी आणि कुठे झाला?

    Ans: हा ऐतिहासिक मोर्चा ६ मार्च १९७१ रोजी ब्रिटनची राजधानी लंडन येथे हायड पार्क ते ट्रॅफलगर स्क्वेअर दरम्यान काढण्यात आला होता.

  • Que: या आंदोलनामागचा मुख्य उद्देश काय होता?

    Ans: स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान वेतन, शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणे आणि प्रजनन आरोग्यावर (गर्भनिरोधक) स्वतःचा अधिकार असणे, हा मुख्य उद्देश होता.

  • Que: या मोर्चात किती लोकांनी सहभाग घेतला होता?

    Ans: या मोर्चात सुमारे ४,००० ते ५,००० महिला, पुरुष आणि लहान मुलांनी सहभाग घेतला होता.

Web Title: International womens day special march 6 1971 the day when women took to the streets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

World Introvert Day 2026 : तुमच्या मुलाला एकटं राहायला आवडतं का? घाबरू नका, कदाचित तो असू शकतो पुढचा ‘एलोन मस्क’
1

World Introvert Day 2026 : तुमच्या मुलाला एकटं राहायला आवडतं का? घाबरू नका, कदाचित तो असू शकतो पुढचा ‘एलोन मस्क’

Navarashtra Special: “शिक्षण हे केवळ रोजगारासाठी नसून…”; काय म्हणाले पुणे विद्यापीठाचे  प्र.कलगुरू?
2

Navarashtra Special: “शिक्षण हे केवळ रोजगारासाठी नसून…”; काय म्हणाले पुणे विद्यापीठाचे प्र.कलगुरू?

Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य
3

Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य

New Year’s Eve : जुन्याला निरोप, नव्याचं स्वागत; जाणून घ्या ‘न्यू इयर इव्ह’ साजरी करण्यामागचा रंजक इतिहास
4

New Year’s Eve : जुन्याला निरोप, नव्याचं स्वागत; जाणून घ्या ‘न्यू इयर इव्ह’ साजरी करण्यामागचा रंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.