अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India Pakistan nuclear list exchange 2026 : भारत आणि पाकिस्तानमधील (India and Pakistan relations) द्विपक्षीय संबंध कितीही ताणलेले असले, तरी काही ऐतिहासिक करार आजही दोन्ही देशांमधील ‘अण्वस्त्र युद्धाचा’ धोका टाळण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. १ जानेवारी २०२६ रोजी, परंपरेनुसार भारताने पाकिस्तानला आपल्या अण्वस्त्र प्रतिष्ठानांची (Nuclear Installations) सविस्तर यादी दिली, तर पाकिस्ताननेही त्यांच्या अणू प्रकल्पांची माहिती भारताला सोपवली. १९९२ पासून सुरू असलेली ही परंपरा २०२६ मध्येही कायम राहिली असून, ही याद्यांची ३५ वी सलग देवाणघेवाण आहे.
३१ डिसेंबर १९८८ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये एक महत्त्वपूर्ण करार झाला होता, ज्याला ‘Agreement on the Prohibition of Attack against Nuclear Installations and Facilities’ असे म्हटले जाते. २७ जानेवारी १९९१ रोजी हा करार अंमलात आला. या कराराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे—दोन्ही देशांनी एकमेकांच्या अणू प्रकल्पांवर, संशोधन केंद्रांवर किंवा अणुभट्ट्यांवर कोणत्याही प्रकारचा लष्करी हल्ला करू नये. जर चुकूनही असा हल्ला झाला, तर त्यातून निर्माण होणारा किरणोत्सर्ग (Radiation) केवळ त्या देशासाठीच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी विनाशकारी ठरू शकतो. म्हणूनच, प्रत्येक वर्षाच्या १ जानेवारीला दोन्ही देश आपल्या अणू प्रकल्पांच्या ठिकाणांची माहिती एकमेकांना देतात, जेणेकरून ‘नो-टार्गेट’ झोन निश्चित राहतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
गेल्या काही वर्षांतील सीमावादाच्या घटना, विशेषतः २०२५ मधील ऑपरेशन सिंदूर आणि मे महिन्यातील चार दिवसांच्या मर्यादित संघर्षानंतर, ही देवाणघेवाण अधिक महत्त्वाची ठरली आहे. जेव्हा दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये संवाद कमी असतो, तेव्हा अशा करारांमुळे ‘मिसकॅल्क्युलेशन’ किंवा चुकीच्या अंदाजामुळे होणारा मोठा विध्वंस टाळण्यास मदत होते. या यादीमध्ये अणुऊर्जा प्रकल्प, युरेनियम समृद्धीकरण सुविधा, पुनर्प्रक्रिया युनिट्स आणि रेडिओअॅक्टिव्ह साहित्याची साठवणूक असलेल्या ठिकाणांचा समावेश असतो.
#BREAKING: India and Pakistan exchange list of nuclear installations in line with annual practice. This is the 35th consecutive exchange of such lists between the two countries, the first one having taken place on 1 January 1992. pic.twitter.com/BxfxJnik0e — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 1, 2026
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी
अण्वस्त्र यादीसोबतच, २००८ च्या कन्सुलर ॲक्सेस करारांतर्गत (Consular Access Agreement) कैद्यांची यादीही बदलण्यात आली. भारताने ३९१ पाकिस्तानी नागरी कैदी आणि ३३ मच्छिमारांची यादी पाकिस्तानला दिली. तर पाकिस्तानने ५८ भारतीय नागरी कैदी आणि १९९ मच्छिमारांची यादी भारताच्या हवाली केली. हे पाऊल दोन्ही देशांमधील मानवी संबंध टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.
Ans: या करारांतर्गत अण्वस्त्र प्रतिष्ठानांची पहिली अधिकृत देवाणघेवाण १ जानेवारी १९९२ रोजी झाली होती.
Ans: या कराराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांच्या अण्वस्त्र प्रतिष्ठानांवर आणि सुविधांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला न करणे हे आहे.
Ans: दरवर्षी १ जानेवारीला यादीसोबतच दोन्ही देश आपल्या ताब्यात असलेल्या नागरी कैदी आणि मच्छिमारांची माहितीही एकमेकांना देतात.






