भारतीय अधिकाऱ्यांनी बांगलादेशमध्ये जमात-ए-तैयबासोबत एक गुप्त बैठक घेतली आणि केली 'ही' मुख्य डील ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India Bangladesh secret meeting Jamaat-e-Islami 2026 : बांगलादेशातील आगामी १२ फेब्रुवारी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी दक्षिण आशियातील राजकारण एका नवीन वळणावर पोहोचले आहे. भारताचे कट्टर विरोधक मानले जाणारे जमात-ए-इस्लामी (Jamaat-e-Islami) आणि भारतीय अधिकारी यांच्यात एक ‘गुप्त बैठक’ पार पडल्याचा खळबळजनक दावा जमातचे अमीर डॉ. शफीकुर रहमान यांनी केला आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी या बैठकीची कबुली दिली, ज्यामुळे भारत आता बांगलादेशातील (India Bangladesh relations) नव्या राजकीय समीकरणांशी जुळवून घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
डॉ. शफीकुर रहमान यांनी सांगितले की, गेल्या वर्षी त्यांच्या बायपास सर्जरीनंतर अनेक देशांच्या राजदूतांनी त्यांची भेट घेतली होती. याच काळात दोन भारतीय राजनैतिक अधिकारी (Diplomats) देखील त्यांना भेटायला आले होते. रहमान यांच्या मते, इतर देशांचे राजदूत उघडपणे भेटले, मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी ही भेट ‘कॉन्फिडेंशियल’ (Confidential) म्हणजेच गुप्त ठेवण्याची विनंती केली होती. “आम्ही सर्वांशी संवाद साधण्यास तयार आहोत. परस्पर संबंध सुधारण्यासाठी पारदर्शकता आवश्यक आहे,” असे म्हणत रहमान यांनी भारताच्या या ‘गुप्त’ धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
मुलाखती दरम्यान शफीकुर रहमान यांनी भारताला एक स्पष्ट संदेश दिला आहे. ५ ऑगस्ट २०२४ च्या सत्तापालटानंतर शेख हसीना भारतात आश्रयाला आहेत, यावरून जमातने नाराजी व्यक्त केली आहे. “शेख हसीना यांचे भारतात राहणे हाच भारत आणि बांगलादेशमधील संबंध सुधारण्यातील मुख्य अडथळा आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. भारत जोपर्यंत हसीना यांना पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत बांगलादेशातील जनभावना भारताच्या विरोधात राहतील, असे संकेत जमातने दिले आहेत.
BIG: India moves to ISOLATE Muhammad Yunus in Bangladesh’s power chessboard.
After Khaleda Zia’s death, PM Modi bypassed protocol, wrote directly to Tarique Rahman.
Jaishankar hand delivered the message.
New Delhi won’t allow Bangladesh to drift into a “Bengali Pakistan. 🇮🇳🔥 pic.twitter.com/tZYl3Ppr9d — @VijayBharat (@shikhar711) January 2, 2026
credit : social media and Twitter
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या बैठकीवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आता बांगलादेशात ‘बॅलन्स्ड अप्रोच’ (Balanced Approach) स्वीकारत आहे. केवळ शेख हसीना यांच्या अवामी लीगवर विसंबून राहण्यापेक्षा, भविष्यात सत्तेवर येऊ शकणाऱ्या बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांसारख्या पक्षांशी संवाद ठेवणे ही भारताची मजबुरी आणि रणनीती दोन्ही आहे. बांगलादेशातील वाढता पाकिस्तानी प्रभाव रोखण्यासाठी भारत या ‘बॅकचॅनेल’ डिप्लोमसीचा वापर करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
निवडणुकीनंतर जमात-ए-इस्लामी एकट्याने सत्ता स्थापन करण्याऐवजी सर्व पक्षांना सोबत घेऊन ‘राष्ट्रीय सहमतीचे सरकार’ (National Consensus Government) स्थापन करण्यास उत्सुक आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सर्वसमावेशक राजकारण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे रहमान यांनी सांगितले. या नवीन सरकारमध्ये भारताची भूमिका काय असेल आणि भारत जमातच्या या ‘मैत्रीच्या हाताला’ कसा प्रतिसाद देतो, यावर दक्षिण आशियातील सुरक्षा अवलंबून असेल.
Ans: ही बैठक ढाका येथील शफीकुर रहमान यांच्या निवासस्थानी झाल्याचा दावा करण्यात आला असून, ही भेट त्यांच्या वैद्यकीय उपचारानंतरची एक सदिच्छा भेट होती.
Ans: भारताचे अवामी लीगशी जुने संबंध आहेत, त्यामुळे कट्टरपंथी पक्षाशी संवाद साधणे हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने ही गुप्तता पाळली गेली असावी, असे मानले जाते.
Ans: जमात १२ फेब्रुवारी २०२६ च्या निवडणुकीत सहभागी होणार असून, ते बीएनपी किंवा इतर पक्षांसोबत मिळून 'युनिटी गव्हर्नमेंट' स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.






