Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August 9 History: आज कांती दिवस; जाणून घ्या ९ ऑगस्टचा इतिहास..

August 9 History: ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा 'क्रांती दिन' आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास थोडक्यात जाणून घ्या. तसेच या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटना, जन्म आणि मृत्यू दिनविशेष वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 09, 2026 | 10:00 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

August 9 History: आज क्रांती दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एका महत्त्वपूर्ण घटनेची आठवण करून देतो. 1942 साली महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकारविरोधात जनतेला उभे राहण्याचे आवाहन केले. या दिवशी, देशभरात आंदोलनाची लाट उसळली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवीन दिशा मिळाली.

या आंदोलनामुळे लाखो भारतीयांनी स्वतःला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी पुढे आले आणि अनेकांना त्यासाठी बलिदानही द्यावे लागले. क्रांती दिवस आपल्याला त्या शूरवीरांच्या त्यागाची आणि संघर्षाची आठवण करून देतो ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आणि देशभक्तिपर गीते आयोजित केली जातात. हा दिवस आपणास देशभक्तीची प्रेरणा देतो आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला कर्तव्यपथावर ठेवतो.

९ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1173 : पिसाच्या टॉवरचे बांधकाम सुरू झाले. हा मिनार तयार होण्यास 200 वर्षे लागली आणि चुकून तिरका बांधला गेला.
  • 1892 : थॉमस एडिसनला डबल वायर मशीनचे पेटंट मिळाले.
  • 1925 : चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या साथीदारांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खजिना लुटला.
  • 1942 : क्रांती दिन
  • 1945 : अमेरिकेने जपानच्या नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला..
  • 1965 : मलेशियातून हद्दपार झाल्यानंतर सिंगापूर स्वतंत्र राष्ट्र बनले. आपल्या इच्छेविरुद्ध स्वातंत्र्य मिळालेला हा जगातील एकमेव देश आहे.
  • 1974 : वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
  • 1993 : भारत छोडो आंदोलनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सरहद गांधी’, खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
  • 1975 : पंतप्रधानांना न्यायालयात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले.
  • 2000 : भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्लीच्या औद्योगिक संशोधन संस्थेतर्फे सुवर्ण महोत्सवी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे आहे? ‘Teach For India’ फेलोशिपद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळणार..

९ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1754 : ‘पिअर चार्ल्स एल्फांट’ – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता यांचा जन्म. (मृत्यू : 14 जून 1825)
  • 1776 : ‘अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो’ – इटालियन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 9 जुलै 1856)
  • 1862 : ‘गंगाधर मेहेर’ – ओडिया रिती कवी यांचा जन्म.
  • 1890 : ‘केशवराव भोसले’ – संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य यांचा जन्म. (मृत्यू : 4 आक्टोबर 1921)
  • 1892 : ‘शियाळि रामामृत रंगनाथन्’ – भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ यांचा जन्म.
  • 1909 : ‘डॉ. विनायक कृष्ण गोकाक’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1992)
  • 1920 : ‘कृ. ब. निकुम्ब’ – घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी यांचा जन्म.
  • 1936 : ‘सतीश कुमार’ – भारतीय ब्रिटिश कार्यकर्ते आणि वक्ता यांचा जन्म.
  • 1975 : ‘महेश बाबू’  भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म.
  • 1991 : ‘हंसिका मोटवानी’ – अभिनेत्री व मॉडेल यांचा जन्म.
Study in UK: युकेमध्ये शिकण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ स्कॉलरशिपची पात्रता आणि अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या!

९ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 117 : 117ई.पुर्व  : ‘ट्राजान – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 18 सप्टेंबर 53)
  • 1107 : ‘होरिकावा’ – जपानी सम्राट यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1078)
  • 1901 : ‘विष्णूदास अमृत भावे’ – मराठी रंगभुमीचे जनक यांचे निधन.
  • 1948 : ‘हुगो बॉस’ – हुगो बॉस कानी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1885)
  • 1976 : ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार यांचे निधन. (जन्म : 14 फेब्रुवारी 1914)
  • 1996 : ‘फ्रॅंक व्हाटलेट’ – जेट इंजिन चे शोधक यांचे निधन. (जन्म : 1 जुन 1907)
  • 2002 : ‘शांताबाई दाणी’ – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1918)
  • 2015 : ‘काययार सिंहनाथ राय’ – भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी यांचे निधन. (जन्म : 8 जून 1915)

Web Title: Kranti din august 9 history and events marathi news 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

National Ayurveda Day : केवळ उपचार नाही तर संतुलित जीवन जगण्याचे शास्त्र; जाणून घ्या आयुर्वेदाचे मानवी जीवनातील स्थान
1

National Ayurveda Day : केवळ उपचार नाही तर संतुलित जीवन जगण्याचे शास्त्र; जाणून घ्या आयुर्वेदाचे मानवी जीवनातील स्थान

World Sign Language Day: शब्दांशिवाय संवादाची जादू! वाचा 23 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन?
2

World Sign Language Day: शब्दांशिवाय संवादाची जादू! वाचा 23 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन?

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…
3

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…

World Gratitude Day: ‘धन्यवाद’ एका शब्दाची जादू बदलायला हवी जीवनशैली; जाणून घ्या 21 सप्टेंबरचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे
4

World Gratitude Day: ‘धन्यवाद’ एका शब्दाची जादू बदलायला हवी जीवनशैली; जाणून घ्या 21 सप्टेंबरचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.